ETV Bharat / sports

U19 T20 World Cup Final : नीरज चोप्राने टीम इंडियाशी साधला संवाद, शेफालीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - शेफालीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या ICC अंडर-19 T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत इंग्लंडशी भिडणार आहे. या सामन्यापूर्वी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने संघाची भेट घेतली.

U19 T20 World Cup Final
नीरज चोप्राने टीम इंडियाशी साधला संवाद
author img

By

Published : Jan 29, 2023, 4:22 PM IST

पॉचेफस्ट्रूम : प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पॉचेफस्ट्रूम येथील सेनवेस पार्क येथे संध्याकाळी 5:15 वाजता खेळवला जाईल. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. भारतीय संघाने विश्वचषकात जबरदस्त खेळ दाखवला आहे. सुपर सिक्समध्ये तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गमावला आहे. भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याची ही संधी अजिबात सोडू इच्छित नाही.

इतिहास रचण्याची संधी : भालाफेकपटू नीरज चोप्राने भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाची भेट घेतली. त्याने संघातील खेळाडूंना विजयाच्या युक्त्या सांगितल्या. नीरज म्हणाला, भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यास सक्षम आहे. त्यांना इतिहास रचण्याची संधी आहे. सर्व खेळाडू एकजुटीने खेळले तर विश्वचषक भारताचाच होईल. दबावाखाली संघाला संयम आणि धैर्याने वागण्याचा सल्ला नीरजने दिला. त्याने टीम इंडियाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. नीरजने शेफाली वर्माला तिच्या 19व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

भारताची विश्वचषक मोहीम : पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव (गट सामना) दुसऱ्या सामन्यात यूएई विरुद्ध 122 धावांनी विजय (गट सामना) तिसऱ्या सामन्यात स्कॉटलंडचा 83 धावांनी पराभव (गट सामना) चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 7 विकेट्सनी पराभव, पाचव्या सामन्यात श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव, आठवा सामना उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव.

दोन्ही संघांकडे दर्जेदार खेळाडू : भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांकडे उपकर्णधार श्वेता सेहरावत आणि कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सच्या रूपाने मजबूत सलामीवीर आहेत. श्वेता फलंदाजांमध्ये भारताची मुख्य आधारस्तंभ आहे. तिने आपल्या स्ट्रोक प्लेने सर्वांना प्रभावित केले आहे. तिने या विश्वचषकात 115.50 च्या सरासरीने 231 धावा केल्या आहेत आणि ती स्पर्धेत फक्त दोनदा बाद झाली आहे. दुसरीकडे ग्रेसने बॅटिंगमध्ये सातत्य राखले आहे. ती 53.80 च्या सरासरीने 269 धावा करत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. तसेच तिने तिच्या ऑफ स्पिनच्या बळावर 7.16 च्या इकॉनॉमीने 6 विकेट्स घेतल्या आहेत. पार्श्वी चोप्रा आणि हॅना बेकर यांच्या रूपाने भारत आणि इंग्लंडकडे दर्जेदार लेगस्पिनर आहेत जे फलंदाजांना ब्रेक लावू शकतात.

शेफाली वर्मा कडून अपेक्षा : अष्टपैलू रायना मॅकडोनाल्ड-गेच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी भारताला कर्णधार शेफाली वर्माच्या जलद खेळीची देखील आवश्यकता असेल. गतवर्षी रायनाने इंग्लंड सिलेक्ट इलेव्हनकडून सीनियर भारतीय संघाविरुद्ध खेळताना 6 बळी घेतले होते. तिने त्यावेळी शेफालीलाही बाद केले होते. महिला विश्वचषक स्पर्धेतील उद्घाटन विजेते होण्याचे लक्ष्य इंग्लंडचे असेल, तर भारत महिला क्रिकेटमध्ये त्यांचे पहिले विश्वविजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल.

भारतीय संघ : भारतीय संघात शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, एस यशश्री, हर्षिता बसू (यष्टीरक्षक), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वी. चोप्रा, तीतस साधू, फलक नाझ आणि शबनम एमडी.

इंग्लंड संघ : एली अँडरसन, हॅना बेकर, जोसी ग्रोव्ह्स, लिबर्टी हीप, नियाम हॉलंड, रायना मॅकडोनाल्ड गे, एम्मा मार्लो, चॅरिस पॉवेल, डेविना पेरिन, लिझी स्कॉट, ग्रेस स्क्रिव्हन्स (सी), सोफिया स्मेल, सेरेन स्मेल, एलेक्सा स्टोनहाउस आणि मैडी वार्ड.

हेही वाचा : भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर होणार 15व्या हॉकी विश्वचषकाचा अंतिम सामना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.