मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बेंंगलोरची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीने संघात एक बदल केला होता. आशा शोभना यांच्या जागी श्रेयंका पाटीलला संघात स्थान देण्यात आले आहे. आम्हाला आधी गोलंदाजी करायची होती, असे मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने म्हटले होते. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करताना 14.2 षटकांत सामना जिंकला.
मुंबई इंडियन्स : यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, हुमैरा काझी, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, जिंतीमणी कलिता, सायका इशाक हे खेळाडू मैदानात होते. रॉयल चॅलेंजर्स बेंंगलोर : स्मृती मानधना (कर्णधार), दिशा कासट, एलिस पेरी, सोफी डेव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर), हीदर नाइट, श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, मेगन शुट, रेणुका सिंग, प्रीती बोस हे 11 खेळाडू खेळत होते.
डब्ल्यूपीएलचा चौथा सामना : मुंबईची फलंदाज नॅट सायव्हर-ब्रंटने 15व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर आणखी एक चौकार मारून तिच्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. मुंबईसाठी या सामन्याची नायक हेली मॅथ्यूज होती. तिने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मॅथ्यूजने प्रथम गोलंदाजी करताना 3 बळी घेतले, त्यानंतर अवघ्या 38 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. नॅट सायव्हर-ब्रंटने 29 चेंडूत 55 धावा केल्यानंतर नाबाद राहिली.
बेंंगलोरचा हा सलग दुसरा पराभव : मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा विजय आहे, तर बेंंगलोरचा हा सलग दुसरा पराभव आहे. बंगळुरूने दिलेल्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या संघाने वेगवान सुरुवात केली आहे. हेली मॅथ्यूजने 10व्या षटकात अर्धशतक ठोकले. या सामन्यात मुंबई इंडियन्स आरसीबीपेक्षा खूप पुढे होते. मुंबई इंडियन्सने 14.2 षटकात 159 धावा करत सामना सहज जिंकला.