ETV Bharat / sports

मुंबई इंडियन्सला मोठा झटका, कर्णधार हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मधून बाहेर?

Hardik Pandya : मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या घोट्याच्या दुखापतीमुळं इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL 2024) बाहेर पडण्याची शक्यता आहे.

Hardik Pandya
Hardik Pandya
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2023, 4:43 PM IST

मुंबई Hardik Pandya : मुंबई इंडियन्सनं इंडियन प्रीमियर लीगसाठी (IPL 2024 ) हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून काही दिवसांपूर्वीच नियुक्ती केली आहे. हार्दिकनं मुंबई इंडियन्ससाठी पाच आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माची जागा घेतली होती. हार्दिकला कर्णधार बनवण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे. कारण पांड्या दुखापतीमुळं क्रिकेटपासून कही दिवसापासून दूर आहे. मुंबई इंडियन्सनं ट्रेडिंग विंडोच्या माध्यमातून हार्दिकचा त्यांच्या संघात समावेश केला होता. हार्दिकनं मागील दोन आयपीएल हंगामात गुजरात टायटन्सचं नेतृत्व केलं होतं.

पांड्या आयपीएल 2024 मधून बाहेर? : आता हार्दिक पांड्याबाबत बातमी समोर येत आहे. दुखापतीमुळं हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसंच अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतही तो खेळण्याची शक्यता नाही. मात्र, बीसीसीआयच्या एका सूत्रानं सांगितलं की, 'हार्दिकच्या फिटनेसबाबत अजूनही कोणतीच माहिती मिळालेली नाही.

अफगाणिस्तानविरुद्ध कर्णधार कोण : हार्दिक पांड्या दुखापतीमुळं बाहेर असणं टीम इंडियासाठी मोठा धक्का ठरू शकतो. सूर्यकुमार यादवला आधीच दुखापत झाली असून तो अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर जाण्याची शक्यता आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवनं ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेचं नेतृत्व केलं. आता या दोन खेळाडूंच्या दुखापतीमुळं रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाचं नेतृत्व करू शकतो.

हार्दिक पांड्याला दुखापत : क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. यामुळं हार्दिकला वर्ल्डकपमधूनच बाहेर पडावं लागलं होतं. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेलाही त्याला मुकावं लागलं होतं. इतकंच नाही, तर हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा भागही नाहीये. हार्दिक पांड्याच्या कारकिर्दीला आकार देण्यात मुंबई इंडियन्सनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2015 मध्ये मुंबईनं हार्दिकला 10 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. हार्दिक 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग होता. पांड्या 2021 पर्यंत मुंबई इंडियन्स संघासोबत होता.

हेही वाचा -

  1. कुस्तीपटू बजरंग पुनियानं परत केला 'पद्मश्री', मोदींना लिहिलं खरमरीत पत्र, PM आवासबाहेरील फूटपाथवर ठेवला पुरस्कार
  2. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; विराट तातडीनं परतला मायदेशी, ऋतुराजही मालिकेतून बाहेर
  3. भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय; भारतानं मालिका घातली खिशात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.