नवी दिल्ली : भारतीय संघाचा दिग्गज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे. यामध्ये धोनी प्रचंड गर्दीत शांतपणे उभा असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ झारखंडमधील माँ देवरी या प्रसिद्ध मंदिराचा आहे. जिथे एमएस धोनी गर्दीमध्ये रांगेत उभा राहून देवीचे दर्शन घेताना दिसत आहे. त्याचवेळी धोनी अगदी शांतपणे उभा असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अलीकडेच किंग विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत ऋषिकेश येथील एका आश्रमात दिसला. आता एमएस धोनी झारखंडमध्ये माँ देवरीच्या मंदिरात पूजा करताना दिसला.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल : एमएस धोनीचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. यावेळेस धोनी त्याच्या काही जवळच्या मित्रांसोबत दिसत आहे. धोनीने निळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. तसेच व्हिडिओमध्ये स्पष्टपणे त्याची बॅक हेअरस्टाईल खूप छान दिसत आहे. नुकताच रांची येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. त्यावेळी हा सामना पाहण्यासाठी धोनी पत्नीसह झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनआंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये दिसला होता. त्यावेळी धोनीने आवर्जून मैदानात जाऊन खेळाडूंची भेट घेतली होती. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विट केला होता. त्यावेळेचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यावर एमएस धोनीच्या चाहत्यांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
धोनी IPL 2023 मध्ये खेळेल का? : महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र धोनीने आयपीएलमध्ये खेळणे सुरूच ठेवले आहे. त्याचवेळी धोनी आयपीएल 2023 मध्ये खेळण्याची शक्यता आहे. धोनी या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जचाही कर्णधार होण्याची शक्यता आहे. याशिवाय धोनी सध्या इतर कोणतेही क्रिकेट खेळत नाही. पण धोनी नियमित फलंदाजी आणि यष्टिरक्षणाचा सराव करत राहतो. माहितीनुसार, तो झारखंडमधील जेएससीए स्टेडियममध्ये सराव करत आहे. धोनी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी टेनिस, बॅडमिंटन आणि इतर क्रिया करत असतो. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता जवळपास 3 वर्षे होऊन गेली. तरी देखील त्याची फॅन फॉलोविंग कमी झाली नाही. चाहते धोनीला भेटण्यासाठी नेहमीच वाट पाहत असतात.
हेही वाचा : ऑस्ट्रेलिया भारतात सराव सामना का खेळत नाही; इयान हिलने सांगितले हे मोठे कारण