ETV Bharat / sports

MS Dhoni Global School: एमएस धोनी ग्लोबल स्कूल 1 जून पासून सुरु होणार

स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी ( Star cricketer Mahendra Singh Dhoni ) हा नेहमीच त्याच्या वेगळ्या शैलीसाठी ओळखला जातो. कधी तो शेतीत व्यस्त दिसतो तर कधी त्याच्या क्रिकेट अकादमीमुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा रांचीचा राजकुमार माही त्याच्या खास शाळेमुळे चर्चेत आला आहे.

MS Dhoni Global School
MS Dhoni Global School
author img

By

Published : May 17, 2022, 9:48 PM IST

रांचीः आयपीएल 2022 संपताच, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये आपल्या व्यवसायाला नवा आयाम देणार आहे. मुलांना बहुआयामी शिक्षण देण्यासाठी महेंद्रसिंग धोनीची विशेष शाळा 1 जूनपासून सुरू होत आहे. 'एमएस धोनी ग्लोबल स्कूल' ( MS Dhoni Global School ) हे माहीच्या या खास शाळेचे नाव आहे.

कर्नाटकातील बंगळुरू येथील एचएसआर साउथ एक्स्टेंशन कुडलू गेटजवळ बांधलेली ही शाळा नवीन तंत्रज्ञान आणि शिक्षण पद्धतीचा अवलंब करेल. ज्यामध्ये अभ्यासासोबतच अनेक प्रकारच्या उपक्रमांचाही समावेश केला जाणार आहे. यासाठी एमएस ग्लोबल स्कूलने मायक्रोसॉफ्ट आणि प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या डान्स विथ माधुरी या संस्थेशी चॅनल पार्टनर म्हणून करार केला आहे. महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी शाळेचे मार्गदर्शक ( Sakshi Dhoni is the school Mentor ) आहेत, तर आर चंद्रशेखर हे शाळेचे अध्यक्ष आहेत.

या सत्रापासून (2022-23) अभ्यास सुरू करण्यासाठी प्रवेशही सुरू झाले आहेत. सध्या प्राथमिक स्तरावरील शिक्षण होणार असून, नर्सरी ते सातवीपर्यंतचे शिक्षण आधुनिक पद्धतीने दिले जाणार आहे. एमएस धोनी ग्लोबल स्कूल हे इंग्रजी माध्यम आहे, सीबीएसई बोर्डाचे शिक्षण दिले जाईल. एमएस धोनी ग्लोबल स्कूल 1 जूनपासून सुरू होत आहे. ही मायक्रोसॉफ्टची शोकेस शाळा असेल. याशिवाय एमएस धोनी स्पोर्ट्स अकादमीचे युनिटही येथे स्थापन करण्यात आले आहे.

महेंद्रसिंग धोनी हा नेहमीच त्याच्य नव्या आणि कल्पक विचारांसाठी ओळखला जातो. या आधीही माहीने रांचीमध्ये ऑर्गेनिक शेती, कडकनाथ कोंबडीपालन, दुग्ध व्यवसाय सारखी कामे सुरू केली आहेत. इतकंच नाही तर धोनीची क्रिकेट अकादमी देश-विदेशी क्रिकेटपटुंची नवी फौज तयार करत आहे.

हेही वाचा - Sehwag & Shoaib : विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने जुन्या आठवणींना उजाळा देताना, शोएब अख्तरला 'या' गोष्टीवरुन काढला चिमटा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.