मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजचा ( Indian women's team captain Mithali ) बायोपिक शाबाश मिठूचा टीझर ( Shabaash Mithu Teaser ) सोमवारी रिलीज झाला. टीझरमध्ये पहिल्यांदाच अभिनेत्री तापसी पन्नू मिताली राजच्या लूकमध्ये बॅट पकडताना दिसत आहे. तापसी भारतीय क्रिकेटपटूच्या लूकमध्ये खूप शोभून दिसत आहे. तापसीने स्वत: आपल्या सोशल मीडिया हँडलवर हा टीझर शेअर केला आहे.
-
In this Gentlemen’s sport, she did not bother to rewrite history ….. instead she created HER STORY! #AbKhelBadlega #ShabaashMithu Coming soon! #BreakTheBias #ShabaashMithu #ShabaashWomen #ShabaashYou pic.twitter.com/qeztCiCu45
— taapsee pannu (@taapsee) March 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">In this Gentlemen’s sport, she did not bother to rewrite history ….. instead she created HER STORY! #AbKhelBadlega #ShabaashMithu Coming soon! #BreakTheBias #ShabaashMithu #ShabaashWomen #ShabaashYou pic.twitter.com/qeztCiCu45
— taapsee pannu (@taapsee) March 21, 2022In this Gentlemen’s sport, she did not bother to rewrite history ….. instead she created HER STORY! #AbKhelBadlega #ShabaashMithu Coming soon! #BreakTheBias #ShabaashMithu #ShabaashWomen #ShabaashYou pic.twitter.com/qeztCiCu45
— taapsee pannu (@taapsee) March 21, 2022
मिताली राजने स्वतः ट्विटरवर त्याच कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर केला आहे. या टीझर व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, गेम ऑफ जेंटलमनच्या खेळात तिने इतिहास रचला आणि स्वत:ची कहाणी निर्माण केली. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या टीझर व्हिडीओबद्दल सांगायचे तर, त्यात कॉमेंट्री प्ले केली जाते आणि मिताली राजचे रेकॉर्ड ( Mithali Raj record ) स्क्रीनवर दाखवले जात आहेत.
-
In a sport dominated by Gentlemen, she did not bother to rewrite history… Instead she created HERSTORY! #AbKhelBadlega#ShabaashMithu Coming soon!#BreakTheBias #ShabaashMithu #ShabaashWomen #ShabaashYou pic.twitter.com/05MqzQhs50
— Mithali Raj (@M_Raj03) March 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">In a sport dominated by Gentlemen, she did not bother to rewrite history… Instead she created HERSTORY! #AbKhelBadlega#ShabaashMithu Coming soon!#BreakTheBias #ShabaashMithu #ShabaashWomen #ShabaashYou pic.twitter.com/05MqzQhs50
— Mithali Raj (@M_Raj03) March 21, 2022In a sport dominated by Gentlemen, she did not bother to rewrite history… Instead she created HERSTORY! #AbKhelBadlega#ShabaashMithu Coming soon!#BreakTheBias #ShabaashMithu #ShabaashWomen #ShabaashYou pic.twitter.com/05MqzQhs50
— Mithali Raj (@M_Raj03) March 21, 2022
या व्हिडिओची सुरुवात खेळाच्या मैदानावरील प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने होते. संपूर्ण टीझरमध्ये इंग्रजी आणि हिंदी समालोचन सुरू आहे. तसेच मिताली राज ड्रेसिंग रूममधून तयार होऊन मैदानात बॅट घेऊन जाताना दिसत आहे. टीझरच्या शेवटी तापसी पन्नू ( Actress Taapsee Pannu ) दिसत आहे, जी मिताली राजची भूमिका साकारत आहे. तिच्या हातात बॅट असून ती भारतीय जर्सीमध्ये हेल्मेट घालून स्ट्राइक घेताना दिसत आहे.
श्रीजीत मुखर्जीचा शाबाश मिठू हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेटपटू आणि एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज हिच्या जीवनाभोवती फिरतो. मितालीने चार विश्वचषकांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. चालू विश्वचषक स्पर्धेत मिताली सहाव्यांदा भारतीय संघाकडून खेळत आहे. 2000 च्या विश्वचषकात ती पहिल्यांदा भारतीय संघात सामील झाली होती.
मितालीच्या नावावर विश्वचषकात सर्वाधिक सामन्यांमध्ये नेतृत्व करण्याचा विक्रम आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्थरावर 10000 धाव करणारी एकमेव महिला खेळाडू होण्याचा विक्रम केला आहे. तसेच तिला तेंडुलकर म्हणूनही ओळखले जाते. अलीकडेच तिला भारत सरकारच्या खेलरत्न पुरस्कारनेही सन्मानित करण्यात आले होते.
भारतीय क्रिकेटपटूंसह अनेक खेळांवर आधारित चित्रपट बॉलिवूडमध्ये बनवले जातात. याआधी एमएस धोनी, अझहर (मोहम्मद अझरुद्दीन), '83' (1983 विश्वचषक विजेता संघ), चक दे इंडिया, गोल असे अनेक चित्रपट बनले आहेत. दुसरीकडे, तापसी पन्नूबद्दल सांगायचे तर, अलीकडेच तिचा एक स्पोर्ट्स आधारित चित्रपट रश्मी रॉकेट आला होता. याशिवाय ती शूटर दादी मध्येही दिसली होती.