ETV Bharat / sports

Chetan Sharma Sting : मुख्य निवडकर्ता चेतन शर्माच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट, बुमराहवर अनेक खळबळजनक खुलासे! - चेतन शर्मा

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. स्टिंग ऑपरेशन मध्ये त्यांनी भारतीय क्रिकेटपटूंच्या फिटनेस व डोपिंग पासून तर खेळाडूंच्या एकमेकांशी असलेल्या अंतर्गत वादावर अनेक खुलासे केले आहेत.

Chetan Sharma
चेतन शर्मा
author img

By

Published : Feb 15, 2023, 7:26 AM IST

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी बनावट इंजेक्शनपासून विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सौरव गांगुली इत्यादी खेळाडूंच्या प्रत्येक गोष्टीवर मोठे वक्तव्य केले आहे. हा सर्व खुलासा त्यांनी एका स्टिंग ऑपरेशन मध्ये केला आहे.

खेळाडू फिट राहण्यासाठी इंजेक्शन घेतात : स्टिंग ऑपरेशन मध्ये चेतन शर्मा यांनी टीम इंडियाच्या अनेक गोपनीय गोष्टींबद्दल सांगितले. ते म्हणाले की, भारतीय क्रिकेटपटू फिट राहण्यासाठी इंजेक्शन घेतात. तसेच त्यांना कोणते इंजेक्शन डोपिंग अंतर्गत येत नाही हे देखील माहीत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माला संघातून बाहेर काढण्यासाठी विश्रांतीचे कारण पुढे केले जात असल्याचेही ते म्हणाले. टीम इंडियाचे खेळाडू पेन किलर घेत आहेत, असे स्टिंगमध्ये विचारण्यात आले होते. यावर चेतन शर्मा म्हणतात की नाही. खेळाडूंनी पेनकिलर घेतल्यास ते डोपिंगच्या कक्षेत येईल. टीम इंडियाच्या खेळाडूंना अँटी-डोपिंगमध्ये कोणते इंजेक्शन येतात हे माहीत आहे.

एक-दोन खेळाडू खाजगीत इंजेक्शन घेतात : त्यानंतर त्यांना जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल विचारण्यात आले. यावर ते म्हणाले की, गंभीर दुखापत झाल्यामुळे बुमराहला खाली झुकणे देखील शक्य नव्हते. याशिवाय एक-दोन खेळाडू खाजगीत इंजेक्शन घेतात, असेही ते म्हणाले. त्याचवेळी बनावट फिटनेसच्या वापरावर ते म्हणाले की, खेळाडू तंदुरुस्त नसतात, पण खेळण्यासाठी ते इंजेक्शन घेतात. 80 टक्के फिटनेस असतानाही ते खेळण्यास तयार होतात. ते इंजेक्शन घेतात आणि खेळायला लागतात.

हार्दिक पांड्या कर्णधार बनेल : स्टिंग ऑपरेशन दरम्यान शर्मा यांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि विराट कोहली यांच्याशी झालेल्या अंतर्गत चर्चेचा खुलासाही केला. तसेच माजी कर्णधार कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात अहंकाराचा वाद असल्याचा आरोपही शर्मा यांनी केला. आगामी काळात हार्दिक पांड्या भारतीय टी20 संघाचा कर्णधार असेल, असा खुलासा देखील त्यांनी केला.

चेतन शर्मांचे भविष्य काय? : बीसीसीआयने चेतन शर्मा यांची नुकतीच पुन्हा एकदा मुख्य निवडकर्त्याच्या पदावर नियुक्ती केली आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषकातील भारताच्या कामगिरीनंतर त्यांना या पदावरून काढून टाकण्यात आले होते. या सर्व घडामोडीनंतर बीसीसीआय आता या प्रकरणाकडे लक्ष देत आहे. चेतन शर्मा हे राष्ट्रीय निवडकर्ते असल्याने मीडियाशी बोलू नये या कराराने ते बांधील आहेत. चेतन शर्मा यांचे भविष्य काय असेल हे बीसीसीआयचे सचिव जय शाहच ठरवतील, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.

हेही वाचा : R. Ashwin New Record : आर अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्यात मोडणार कुंबळेचा रेकाॅर्ड; नवीन विक्रमाची होणार नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.