मुंबई: आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 ( ICC T20 World Cup 2022 ) या स्पर्धेला 16 ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे. त्या अगोदर भारताचे काही फलंदाज आपल्या खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहेत. सीझन 2021 टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि केएल राहुल होती. पण आयपीएल 2022 मध्ये राहुल ( Opener KL Rahul ) या स्पर्धेतील सर्वोत्तम भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने दहा सामन्यांमध्ये 56.38 च्या सरासरीने आणि 145.01 च्या स्ट्राइक रेटने 451 धावा केल्या, ज्यात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या दोन शतकांचा समावेश आहे.
दुसरीकडे, शर्माने 9 डावात 17.22 च्या सरासरीने आणि 123.01 च्या स्ट्राइक रेटने फक्त 155 धावा केल्या. त्याच वेळी, भारतीय संघात, त्याचा एकदिवसीय सलामीचा जोडीदार शिखर धवन ( Opener Shikhar Dhawan ) पंजाब किंग्जमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याने दहा सामन्यांमध्ये 46.13 च्या सरासरीने आणि 124.66 च्या स्ट्राइक रेटने 369 धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्ध ओपनिंग करणारा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन याने दोन अर्धशतकांसह आयपीएल 2022 हंगामाची सुरुवात केली, परंतु त्यानंतरच्या सामन्यांमध्ये तो आपली कामगिरी दाखवू शकला नाही. नऊ सामन्यांमध्ये किशनने 28.13 च्या सरासरीने आणि 111.38 च्या स्ट्राईक रेटने केवळ 225 धावा केल्या आहेत.
विराट कोहली ( Virat Kohli ) गेल्या दोन वर्षांपासून आऊट ऑफ फॉर्ममध्ये आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडल्यानंतरही कोहली खराब फॉर्ममधून जात आहे. त्याने 11 सामन्यात 21.60 च्या सरासरीने 216 धावा केल्या. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले, परंतु या खेळीने कोहली पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचे सूचित केले नाही.
यष्टिरक्षक-फलंदाजच्या बाबतीत, ऋषभ पंतने ( Rishabh Pant ) दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना 149.04 च्या स्ट्राइक रेटने 234 धावा केल्या आहेत. पण राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने दहा सामन्यांत 153.6 च्या स्ट्राईक रेटने 298 धावा करून पंतपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आयपीएल 2022 संपेपर्यंत आणि भारताचा विश्वचषक सुरू होण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बराच वेळ शिल्लक आहे. पण आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर भारताचे फलंदाज सध्याच्या स्पर्धेत आपली दमदार कामगिरी दाखवू शकलेले नाहीत.
हेही वाचा - IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 13 धावांनी विजयी, चेन्नईचा पराभव करत मिळवले चौथे स्थान