मुंबई: गेल्या शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात नो-बॉलच्या वादानंतर, टीव्ही पंचांनी भविष्यात संपूर्ण कंबरेवरील फुल टॉस बॉलकडे पाहण्याची गरज असल्याचे, मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने ( MI head coach Mahela Jayawardene ) यांना वाटते. या सामन्यात राजस्थानने 15 धावांनी विजयी मिळवला. त्या अगोदर मैदानावरील पंचांनी नो-बॉल न दिल्याने खूप नाट्य घडले. जेव्हा रोव्हमन पॉवेलने शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ओबेड मॅकॉयला षटकार ठोकला होता.
डगआउटमध्ये, कर्णधार ऋषभ पंतने पॉवेल आणि कुलदीप यादव यांना मैदानातून परत बोलावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी दिल्ली कॅम्पमध्ये संताप निर्माण झाला होता. त्यानंतर सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी मैदानावरील पंचांकडे निर्णयावर चर्चा करण्यासाठी मैदानावर गेले होते. पंत आणि अमरे या दोघांनाही त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला होता. त्याचबरोबर प्रवीण अमरे यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात ( Praveen Amre One match ban ) आली होती.
टीव्ही अंपायरने कंबरेवरील फुल टॉस बॉल्सचे परीक्षण करण्याची सध्या खेळाच्या कायद्यात कोणतीही तरतूद नाही आणि जयवर्धनला असे वाटते की, भविष्यात अशा कॉल्सकडे लक्ष वेधले जावे. आयसीसी रिव्ह्यू शोमध्ये जयवर्धने ( Jayawardene On ICC Review Show ), हे असे काहीतरी आहे जे मला वाटते की टीव्ही पंचांनी पाहणे आवश्यक आहे. थर्ड अंपायरकडे या गोष्टी पाहण्याचा आणि मुख्य पंचांना कळवण्याचा पर्याय आहे का की हा चेंडू तपासला पाहिजे? त्यावेळी दिल्ली कॅम्पच्या वागण्याने जयवर्धने प्रभावित झाले नाहीत.
महेला जयवर्धने म्हणाला, तुम्ही एख सामना थांबवता लोक मैदानावर येतात, हे पाहून निराशा झाली. पण शेवटच्या षटकात ती फक्त उच्च भावना होती असे मला वाटते. एक-दोन षटकार मारले गेले आणि अंपायर चुकला असण्याची शक्यता होती. पण त्या गोष्टी तपासण्यासाठी तुम्ही थर्ड अंपायरकडे जाऊ शकत नाही, असे नियम सांगतात. त्याने पुढे टिपणी केली की जेव्हा प्रशिक्षक अमरे मैदानात उतरतात तेव्हा मैदानावरील पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही चांगली गोष्ट नाही.
श्रीलंकेचा माजी कर्णधार जयवर्धनेने खुलासा केला की, त्याने मुंबई संघाशी नो-बॉल ड्रामावर चर्चा केली आणि सांगितले की अंतिम षटकातील त्यांच्या वागणुकीमुळे पंत आणि अमरे स्वतः दुःखी असतील.
हेही वाचा - IPL 2022 SRH vs GT : गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्यासाठी आज गुजरात आणि हैदराबाद आमने सामने