मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला फक्त 6 दिवस शिल्लक राहिले आहेत. तसेच या स्पर्धेसाठी यंदा 10 संघांनी कंबर कसली आहे. परंतु आयपीएल 2022 च्या हंगामात सहभागी झालेल्या लखनौ सुपरजायंट्स संघाला स्पर्धा सुरु होण्यागोदर मोठा धक्का बसला आहे. लखनऊ सुपरजायंट्स संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज ( Mark wood Ruled Out of IPL ) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. याबाबत आता लखनौ सुपरजायंट्सने ट्विट करत एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
-
We will miss you this season, speedster! @MAWood33 🚀 #LucknowSuperGiants family wishes our Woody a speedy recovery!💪
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🎥: Fancode #AbApniBaariHai #TataIPL #IPL2022 #CricketNews #CricketUpdates pic.twitter.com/Kf9S1gUJuO
">We will miss you this season, speedster! @MAWood33 🚀 #LucknowSuperGiants family wishes our Woody a speedy recovery!💪
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 18, 2022
🎥: Fancode #AbApniBaariHai #TataIPL #IPL2022 #CricketNews #CricketUpdates pic.twitter.com/Kf9S1gUJuOWe will miss you this season, speedster! @MAWood33 🚀 #LucknowSuperGiants family wishes our Woody a speedy recovery!💪
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 18, 2022
🎥: Fancode #AbApniBaariHai #TataIPL #IPL2022 #CricketNews #CricketUpdates pic.twitter.com/Kf9S1gUJuO
वेगवान गोलंदाड मार्क वूडला आयपीएलच्या मेगा लिलावात 7.50 कोटीची बोली लावत खरेदी केले होते. इतकी मोठी रक्क्म मिळाल्याने मार्क वूड देखील खुश होता. परंतु इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड कोपराच्या दुखापतीमुळे ( Injury to Mark Wood's corner ) आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामातून बाहेर पडला आहे. याबाबत लखनौ सुपरजायंट्सने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
लखनौ सुपरजायंट्सने ( Lucknow Supergiants tweet ) आपल्या ट्विटर हँडलवरुन मार्क वूडबद्दल एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये लखनौ सुपरजायंट्सने म्हणले आहे की, या हंगामात आम्ही तुला खुप मिस करु. आशा आहे की, तू लवकर बरा होशील. त्याचबरोबर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मार्क वूड इंग्लंडच्या पांढऱ्या जर्सीत क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे.
लखनौ सुपर जायंट्स यांचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध 28 मार्च रोजी संध्याकाळी 7.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. संघात अनेक महान खेळाडू आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौचा संघ त्यांच्या पहिल्याच आयपीएल हंगामात इतिहास रचण्यासाठी सज्ज असणार आहे.