न्यॉन (स्वित्झर्लंड): ऑस्ट्रेलियाची दिग्गज क्रिकेटपटू लिसा स्थळेकर फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोशिएशन (FICA) ची पहिली महिला अध्यक्ष बनली ( Lisa Sthalekar appointed first woman president ) आहे. न्यॉन, स्वित्झर्लंड येथे झालेल्या FICA कार्यकारी समितीच्या बैठकीत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार, 42 वर्षीय स्थळेकर यांनी या पदावर नियुक्ती निश्चित केली. त्यांच्या आधी दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज बॅरी रिचर्ड्स, वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू जिमी अॅडम्स आणि अलीकडेच इंग्लंडचे माजी फलंदाज विक्रम सोलंकी यांनी हे पद भूषवले आहे.
-
FICA is pleased to announce Lisa Sthalekar as its new President
— FICA (@FICA_Players) June 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read more:https://t.co/s4tCEoki14 pic.twitter.com/nIQgiozLQZ
">FICA is pleased to announce Lisa Sthalekar as its new President
— FICA (@FICA_Players) June 21, 2022
Read more:https://t.co/s4tCEoki14 pic.twitter.com/nIQgiozLQZFICA is pleased to announce Lisa Sthalekar as its new President
— FICA (@FICA_Players) June 21, 2022
Read more:https://t.co/s4tCEoki14 pic.twitter.com/nIQgiozLQZ
या आठवड्यात निऑन, स्वित्झर्लंड येथे झालेल्या फिका ( Federation of International Cricketers Associations ) कार्यकारी समितीच्या बैठकीत लिसा स्थळेकर यांची FICA अध्यक्ष म्हणून पुष्टी करण्यात आली आहे, असे फिकाने एका निवेदनात म्हटले आहे. कोविड-19 महामारीनंतर फिकाची ही पहिलीच बैठक होती. फिकाचे कार्यकारी अध्यक्ष हेथर मिल्स ( Executive chairman of FICA Heather Mills ) म्हणाले, "आमच्या सदस्यांशी सल्लामसलत केल्यानंतर, आमच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून लिसा यांची नियुक्ती झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे."
दरम्यान, स्थळेकर म्हणाले, आम्ही खेळाच्या एका नवीन युगात प्रवेश करत आहोत, ज्यामध्ये आमच्या पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी पूर्वीपेक्षा अधिक क्रिकेटचा समावेश आहे. आता अधिक देश हा खेळ खेळत आहेत, जे क्रिकेट हा जागतिक खेळ बनत असल्याचा पुरावा आहे. पुण्यात जन्मलेल्या स्थळेकर ( Pune-born Lisa Sthalekar ) यांनी खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 187 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. स्थळेकरने 125 एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतके आणि 16 अर्धशतकांच्या मदतीने 2728 धावा केल्या. याशिवाय त्यांनी ऑफ स्पिनर म्हणून 146 विकेट्स घेतल्या.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावा आणि 100 बळी घेणारी ती पहिली महिला क्रिकेटर ( first woman president of FICA ) ठरली. त्यांनी आठ कसोटी आणि 54 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले. 2021 मध्ये त्यांचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला.
हेही वाचा - MP Ranji Team : मध्य प्रदेशच्या रणजी संघाचा गौरव करण्यात येणार - मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान