ETV Bharat / sports

Symonds Funeral ceremony : पाँटिंग आणि गिलख्रिस्टसह दिग्गज खेळाडूंनी सायमंड्सला दिला शेवटचा निरोप - अ‍ॅलन बॉर्डर

या महिन्याच्या 14 तारखेला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू ( Andrew Symonds dies in car accident ) झाला होता. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी हे जग सोडले. त्याला रिव्हरवे स्टेडियममध्ये अखेरची श्रद्धांजली शुक्रवारी वाहण्यात आली. या कार्यक्रमाला अनेक आजी माजी खेळाडूंनी हजेरी लावली होती.

Symonds
Symonds
author img

By

Published : May 27, 2022, 8:22 PM IST

सिडनी: ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्स यांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी रिव्हरवे स्टेडियममध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ( Symonds funeral ceremony ) आले होते. सायमंड्सचे निकटवर्तीय आणि माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पाँटिंग, अ‍ॅलन बॉर्डर, अ‍ॅडम गिलख्रिस्ट ( Adam Gilchrist ), डॅरेन लेहमन आणि इयान हिली आदींनी शुक्रवारी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

या महिन्याच्या 14 तारखेला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा ( Former cricketer Andrew Symonds ) कार अपघातात मृत्यू झाला होता. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी हे जग सोडले. अँड्र्यू सायमंड्स ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-20) क्रिकेट खेळला आहे.

funeral ceremony
funeral ceremony

याशिवाय तो आयपीएलच्या पहिल्या 2 हंगामातही खेळला होता. सायमंड्सने ऑस्ट्रेलियाकडून 26 कसोटी खेळल्या आणि 1462 धावा केल्या. त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 162 होती. तसेच 198 एकदिवसीय सामने खेळताना त्याने 5088 धावा केल्या, ज्या दरम्यान त्याने बॅटने सहा शतके झळकावली आहेत.

टी20 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून 14 सामने खेळणाऱ्या सायमंड्सने 48.14 च्या सरासरीने 337 धावा केल्या. आयपीएलमध्ये खेळताना सायमंड्सने 20 विकेट्स घेण्यासोबतच 36.07 च्या सरासरीने 974 धावा केल्या होत्या. सायमंड्सने आयपीएलमध्ये 39 सामने खेळले आहेत.

सायमंड्सला 'रॉय' का म्हणतात?

सायमंड्सच्या बालपणीच्या प्रशिक्षकाने त्याला पहिल्यांदा 'रॉय' म्हटले होते. सायमंड्स हा माजी बास्केटबॉलपटू लेरॉय लॉगगिन्ससारखा दिसत होता आणि म्हणूनच सायमंड्सला हे टोपणनाव मिळाले. लेरॉय हा माजी अमेरिकन ऑस्ट्रेलियन बास्केटबॉल खेळाडू आहे.

मॅथ्यू मॉटचा खुलासा, इंग्लंडकडून खेळण्याचा सायमंड्सचा विचार होता -

इंग्लंडच्या T20 आणि एकदिवसीय संघाचे नवे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी खुलासा केला आहे की, ऑस्ट्रेलियाचा दिवंगत अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सने इंग्लंडकडून खेळण्याचा विचार केला होता. कारण त्याच्याकडे यूकेचा पासपोर्ट होता. सायमंड्स (46) याचा या महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथे कार अपघातात मृत्यू झाला.

क्रिकेट 365 डॉट कॉमच्या वृत्तानुसार, "त्याने (सायमंड्स) निश्चितपणे (इंग्लंडसाठी) याचा विचार केला होता, यावेळी मॉटने ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर-फलंदाज इयान हिली यांना शुक्रवारी दिवंगत क्रिकेटरच्या पब्लिक मेमोरियल सेवेत सांगितले.

बर्मिंगहॅममध्ये जन्मलेल्या क्रिकेटपटूला 1995 च्या उत्तरार्धात मिळालेल्या ऑफरबद्दल मोटला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, "ही (ऑफर) त्याच्यासाठी खूप मोहक होती, मुळात त्याला चांगली संधी मिळाली होती आणि त्याचे पालकही तिथे होते. पण ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यासाठी तो उत्सुक होता, कारण ते त्याचे बालपणीचे स्वप्न होते.

खरं तर, काउंटी संघ ग्लुसेस्टरशायरने सायमंड्सला बिगर परदेशी खेळाडू म्हणून करारबद्ध केले होते आणि तत्कालीन 19 वर्षीय सायमंड्सने या मोसमात चार शतके झळकावली आणि त्याला पाकिस्तान दौर्‍यासाठी इंग्लंड अ संघात खेळण्याची ऑफर देण्यात आली होती.

त्याच्या पहिल्या काउंटी सामन्यात, सायमंड्सने ऑगस्ट 1995 मध्ये ग्लॅमॉर्गनविरुद्ध नाबाद 254 धावा करताना 16 षटकार मारले होते. आताच इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने या महिन्याच्या सुरुवातीला डरहमकडून खेळताना विक्रम मोडण्याच्या जवळ आला होता, मात्र सायमंडसचा विक्रम मो़डू शकला नाही. अहवालात म्हटले आहे की, सायमंड्सने नासेर हुसेनच्या नेतृत्वाखालील संघाकडून खेळण्याची ऑफर नाकारली आणि त्याऐवजी ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची घोषणा केली. एका वर्षानंतर तो त्यांच्या ए संघात सामील झाला.

सायमंड्सचा माजी ऑस्ट्रेलियाचा सहकारी डॅरेन लेहमन म्हणाला की, इंग्लंड हे दिवंगत क्रिकेटपटूंचे आवडते ठिकाण राहिले आहे. लेहमन म्हणाला, त्याला इंग्लंडचा दौरा खूप आवडला होता, तिथे खेळायला मजा आली होती. सायमंड्स हा मी आतापर्यंत प्रशिक्षित केलेला सर्वोत्तम खेळाडू होता. ही जोडी इंडियन प्रीमियर लीग संघ डेक्कन चार्जर्समध्ये सोबत होती असताना लेहमनने सायमंड्ला प्रशिक्षण दिले होते.

हेही वाचा - Ipl 2022 2nd Qualifier Rr Vs Rcb : नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.