लाहोर: पाकिस्तानचा महान फलंदाज झहीर अब्बास ( Legendary Pakistan cricketer Zaheer Abbas ) याला लंडनमधील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. झहीर अब्बास यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती.
मीडियातील वृत्तानुसार, 74 वर्षीय अब्बास यांना पॅडिंग्टन येथील सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये दाखल ( Admitted to St Mary's Hospital ) केल्यानंतर तीन दिवसांनी त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. अब्बास, त्याच्या काळातील एक कलात्मक फलंदाजांपैकी एक असलेले, दुबई ते लंडन प्रवासादरम्यान त्यांना कोविड-19 ची लागण झाली आहे. लंडनला पोहोचल्यानंतर त्यांना वेदना होत होत्या आणि त्यांना न्यूमोनिया झाला होता.
मीडियातील वृत्तानुसार, 'सध्या ते डायलिसिसवर आहे आणि डॉक्टरांनी त्यांना लोकांना न भेटण्याचा सल्ला दिला आहे.'
अब्बासने 1969 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण ( Zaheer International debut against New Zealand ) केले होते. त्याच्या पिढीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक, अब्बासने 72 कसोटीत 5062 धावा आणि 62 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2572 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 459 सामन्यांमध्ये 34843 धावा केल्या ज्यात 108 शतके आणि 158 अर्धशतकांचा समावेश आहे. निवृत्तीनंतर त्यांनी एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये आयसीसी मॅच रेफरीची भूमिकाही बजावली.
2020 मध्ये जॅक कॅलिस आणि लिसा स्थळेकर यांच्यासह अब्बासचा आयसीसी ( International Cricket Council ) हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. झहीर अब्बास यांना आशियाचे डॉन ब्रॅडमन असेही संबोधले जात होते, कारण तंत्रशुद्ध फलंदाजीची शैली त्यांच्या व्यतिरिक्त कोणाकडेच नव्हती.
हेही वाचा - MP Ranji Team : मध्य प्रदेशच्या रणजी संघाचा गौरव करण्यात येणार - मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान