ETV Bharat / sports

Legend League Cricket 2022 : केविन ओ'ब्रायनच्या शतकाच्या जोरावर गुजरात जायंट्सचा 3 विकेट्सने रोमांचक विजय

गुजरात जायंट्सने इंडिया कॅपिटल्सवर 3 विकेट्सने मात ( Gujarat Giants win by three wickets ) केली. प्रथम फलंदाजी करताना इंडिया कॅपिटल्सने 179 धावा केल्या. इंडिया कॅपिटल्सकडून ऍशले नर्सने शानदार 103 धावा केल्या. या सामन्यात केविन ओब्रायन ( Kevin OBrien century ) आणि नर्स या दोघांनी शतके झळकावली.

author img

By

Published : Sep 18, 2022, 4:15 PM IST

Kevin OBriens
केविन ओब्रायन

कोलकाता : शनिवारी ईडन गार्डन्सवर इंडिया कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स ( India Capitals vs Gujarat Giants ) संघात सामना खेळला गेला. या सामन्यात केविन ओ'ब्रायनने शतकी खेळी ( Kevin OBrien century ) करत ऍशले नर्सच्या 43 चेंडूतीसल नाबाद 103 धावांवर पाणी फेरले ( Ashley Nurse century in vain ). ब्रायनच्या या खेळीमुळे गुजरात जायंट्सने लीजेंड लीग क्रिकेटमध्ये ( Legend League Cricket ) इंडिया कॅपिटल्सवर तीन गडी राखून रोमांचक विजय ( Gujarat Giants win by three wickets ) नोंदवला.

ईडन गार्डन्सवर शनिवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन आकर्षक शतके झळकली. आयर्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ओब्रायनने 61 चेंडूंत 15 चौकार आणि तीन षटकारांसह 106 धावा केल्या. या खेळीसह, जॉइंट्स आठ चेंडू राखून जिंकले.

180 धावांच्या लक्ष्यासमोर संयुक्त कर्णधार वीरेंद्र सेहवाग पुन्हा अपयशी ( Captain Virender Sehwag failed again ) ठरला आणि अशा स्थितीत ओब्रायनने जबाबदारी चोखपणे पेलली. प्रवीण तांबे (28 धावांत 3 बळी) चांगली गोलंदाजी करूनही जॉइंट्स संघाने 18.4 षटकांत 7 बाद 180 धावा केल्या. ओब्रायनने याआधी शुक्रवारी एका चॅरिटी सामन्यात 52 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात देखील सेहवागला धावा करता आल्या नव्हत्या.

तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ऍशले नर्सच्या ( All rounder Ashley Nurse ) आठ चौकार आणि नऊ षटकारांच्या जोरावर इंडिया कॅपिटल्सने 20 षटकांत सात बाद 179 धावा केल्या. तसेच रयाद इम्रत आणि केपी अप्पण्णा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

हेही वाचा - Virat Kohli New Hairstyle : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी किंग कोहली दिसला एका नव्या हेअरस्टाईलमध्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.