नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी टी-२० लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगचा ( Indian Premier League ) यंदा पंधरावा हंगाम खेळला जाणार आहे. या स्पर्धेला 26 मार्चला प्रारंभ होणारा आहे. तत्पुर्वी आयपीएलच्या पहिल्या पर्वाचा विजेतां संघ राजस्थान रॉयल्सने जोरदार कंबर कसली आहे. या संघानेल त्याच्या वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदी लसिथ मलिंगाची नियुक्ती ( Lasith Malinga appointed fast bowling coach ) केली आहे.
38 वर्षीय वेगवान गोलंदाज टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार मलिंगा, ज्याने श्रीलंकेकडून तीनही फॉरमॅटमध्ये 340 सामने खेळले आहेत आणि 546 विकेट घेतल्या आहेत. या मोसमात राजस्थान रॉयल्स संघाची ( Rajasthan Royals team ) गोलंदाजी रणनीती तयार करण्यावर तो काम करेल.
-
Back in @IPL as the Fast Bowling Coach of @rajasthanroyals 💪😇
— Lasith Malinga (@ninety9sl) March 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Excited to join #RoyalsFamily and @KumarSanga2 🤝
Halla Bol💗#TATAIPL2022 #CricketTogether https://t.co/mJYeqNn5On
">Back in @IPL as the Fast Bowling Coach of @rajasthanroyals 💪😇
— Lasith Malinga (@ninety9sl) March 11, 2022
Excited to join #RoyalsFamily and @KumarSanga2 🤝
Halla Bol💗#TATAIPL2022 #CricketTogether https://t.co/mJYeqNn5OnBack in @IPL as the Fast Bowling Coach of @rajasthanroyals 💪😇
— Lasith Malinga (@ninety9sl) March 11, 2022
Excited to join #RoyalsFamily and @KumarSanga2 🤝
Halla Bol💗#TATAIPL2022 #CricketTogether https://t.co/mJYeqNn5On
लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स या एकमेव संघाचे प्रतिनिधित्व करताना 122 सामन्यांमध्ये 170 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच या वेगवान गोलंदाजाने सांगितले की, तो नवीन फ्रँचायझीसह नवीन आठवणी निर्माण करण्यास उत्सुक आहे. मलिंगाने फ्रँचायझीने जारी केलेल्या निवेदनात ( Lasith Malinga on RR ) म्हटले आहे की, “आयपीएलमध्ये परतणे माझ्यासाठी एक अद्भुत भावना आहे आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामील होणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ज्यानी नेहमीच तरुणांच्या कलागुणांना प्रोत्साहन आणि वाव दिला आहे. त्याचबरोबर त्यांना घडवले आहे.
तो पुढे म्हणाला, वेगवान गोलंदाजी युनिट स्पर्धेत सहभागी झाल्याने मी उत्साहित आहे आणि सर्व वेगवान गोलंदाजांना त्यांच्या खेळाच्या योजना आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पाठिंबा देण्यासाठी मी उत्सुक आहे. आयपीएलमध्ये मुंबईसोबतच्या माझ्या खास आठवणी आहेत ( My special memories with Mumbai ). भारतीयां सोबत आणि आता रॉयल्ससह, या प्रवासात नवीन अनुभव आणि छान आठवणी निर्माण करण्यासाठी उत्सुक आहे.
दरम्यान, राजस्थानने पॅडी अप्टनला संघ उत्प्रेरक म्हणून नव्या भूमिकेत सामील केले आहे. 2013-15 आणि नंतर 2019 मध्ये फ्रँचायझीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत, 2013 आणि 2015 मध्ये संघाला चॅम्पियन्स लीगमध्ये ( Champions League competition ) पहिल्या चारमध्ये स्थान मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान दिले होते. त्यामुळे अप्टनचे रॉयल्समध्ये पुनरागमन महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.