ETV Bharat / sports

Kohli fan at Wankhede : विराट कोहलीची बॅटिंग पाहायला वानखडेवर दिवान्यांची गर्दी

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज भारत श्रीलंका यांच्यात अतिशय अटीतटीचा सामना सुरू आहे. सद्या कोहली बॅटिंग करत आहे. तर सचिनच्या ४९ शतकांच्या विक्रमाशी तो बरोबरी करेल का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. वानखडेवर कोहलीच्या दिवान्यांची चांगलीच गर्दी जमली आहे.

Kohali fan at wankhede
कोहलीचे दिवाने वानखडेवर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 2:32 PM IST

Updated : Nov 2, 2023, 3:06 PM IST

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर भारत-श्रीलंका सामना सुरू आहे. भारताने २०११ च्या विश्वकपच्या अंतिम सामन्यात १२ वर्षांपूर्वी याच वानखडे स्टेडियमवर श्रीलंकेला ६ विकेटनं पराजित केलं होतं. त्या सामन्याचा हिरो भारतीय टीमचा कप्तान महेंद्रसिंग धोनी ठरला होता. आज श्रीलंकेनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असल्यानं भारताची फलंदाजी याची देही याची डोळा वानखडेवर बघण्यासाठी हजारो भारतीय उत्सुक झाले आहेत. त्यात सर्वांचं लक्ष विराट कोहलीच्या बॅटकडे लागलं असून सचिनच्या ४९ शतकांच्या विक्रमाशी तो बरोबरी करेल का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

कोहलीची बॅट चमकणार : २०११ च्या विश्वचषक टीम मधील विराट कोहली व रवींद्र अश्विन हे दोनच खेळाडू यंदाच्या टीममध्ये आहेत. आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत ४८ शतकं ठोकलेल्या विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या ४९ शतकाशी बरोबरी करण्यासाठी अवघ्या एका शतकाची गरज आहे. याच कारणानं आज या सामन्याकडे तमाम भारतीय क्रिकेट प्रेमींचं लक्ष विराट कोहलीच्या शतकावर लागलं असून विराट कोहलीची बॅटिंग बघण्यासाठी चाहते ही मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत वानखेडे स्टेडियमवर दाखल झाले असून विराटच्या शतकासाठी सर्व प्रार्थना करत आहेत.

मी विराट कोहलीचा दिवाना : याविषयी बोलताना ऋषी दुबे या युवा क्रिकेट चाहत्याने सांगितलं आहे की, १२ वर्षांपूर्वी याच वानखडे स्टेडियमवर भारत श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यानंतर मुंबई दीपावली साजरी करण्यात आली होती. मी विराट कोहलीचा अतिशय दिवाना असून विशेष करून विराट कोहलीचं शतक बघण्यासाठी आज मी वानखडे येथे आलो आहे. भारतीय संघ ज्या फॉर्ममध्ये सध्या खेळत आहे ते पाहता भारत हा सामना जिंकणार याबाबत दुमत नाही. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे विराट कोहलीचं शतक हे असणार आहे. ऋषी हा विराट कोहलीच्या १८ नंबरची आवडती जर्सी घालून वानखडेवर दाखल झाला आहे.

वानखडेवर धावांचा पाऊस : आतापर्यंत या विश्वचषकाचे दोन सामने वानखेडे स्टेडियमवर झाले असून दोन्ही सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पडला आहे. हे दोन्ही सामने दक्षिण आफ्रिकेचे होते. त्यांनी बांगलादेश विरुद्ध ५ बाद ३८३ तर इंग्लंड विरुद्ध ७ बाद ३९९ धावांचा पाऊस पाडला होता. अशात आज प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेत केलेल्या धावांपेक्षा जास्त धावा भारत करेल का, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारताला सामना जिंकण्याबरोबर रनरेटमध्ये सुद्धा प्रगती करणे गरजेचे असून भारत ४०० चा टप्पा गाठतो का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

  1. 7 Records in NZ vs SA Match : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका सामन्यात आफ्रिकेनं केले 'हे' सात विक्रम
  2. Cricket World Cup 2023 IND vs SL : उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी भारतीय संघ मैदानात; दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन काय?
  3. Surendra Nayak Exclusive Interview : भारतीय संघासाठी रोहित शर्मा देवानं दिलेली देणगी - माजी क्रिकेटपटू सुरेंद्र नायक

Last Updated : Nov 2, 2023, 3:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.