ETV Bharat / sports

IND v WI T20 Series : वेस्टइंडीजने अपमानित वाटून घेऊ नये - कर्णधार किरॉन पोलार्ड

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका पार पडलीय. या मालिकेत वेस्ट इंडिजचा दारुन पराभव झाला. या पराभवानंतर कर्णधार किरॉन पोलार्डने प्रतिक्रिया ( Kieron Pollard reaction after the defeat ) देताना सुर्यकुमार यादव आणि निकोलस पूरन यांचे कौतुक केले आहे.

author img

By

Published : Feb 21, 2022, 5:50 PM IST

Kieron Pollard
Kieron Pollard

कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( India v West Indies ) यांच्यतील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा टी20 सामना रविवारी खेळला गेला. या सामन्यात सुर्यकुमार यादव शानदार फलंदाजी करताना 65 धावांची खेळी केली. त्या जोरावर भारतीय संघाने 17 धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर टी20 मालिकेत वेस्ट इंडिजला 3-0 ने क्लीन स्वीप दिला. ही मालिका गमावल्यानंतर वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार किरॉन पोलार्डने प्रतिक्रिया ( Captain Kieron Pollard reaction ) दिली आहे.

पोलार्ड सामन्यानंतर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत ( Virtual Press Conference of Polard ) संवाद साधताना म्हणाला, होय आम्ही 3-0 ने हरलो. पण खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून दिले. मला वाटते की आपल्या अपमानित झाल्यासारखे वाटले नाही ( West Indies should not be offended ) पाहिजे. पराभवामुळे आम्ही खुश नाही. आम्ही सामना जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. पोलार्ड म्हणाला, यावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विजय आणि पराभव यातील थोडा फरक दिसून येतो. यावरून गोलंदाजी किंवा फलंदाजीतील चुकांमधील फरक दिसून येतो.

पोलार्ड पुढे म्हणाला, “शेवटच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी करणे हे एक असे क्षेत्र आहे, ज्यावर आपल्याला काम करणे आवश्यक आहे. पहिल्या 15 षटकांचा विचार केला, तर आम्हाला वाटते की आम्ही आम्हाला हवे तसे प्रदर्शन केले. वेस्ट इंडिजसाठी सर्वात सकारात्मक बाब म्हणजे यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरनचे फॉर्ममध्ये ( Wicketkeeper-batsman Nicholas Pooran ) परतणे, ज्याने तीन अर्धशतके झळकावली आणि 61.33 च्या सरासरीने 184 धावा केल्या.

पोलार्ड म्हणाला, माझ्या मते ही एक चांगली मालिका होती. खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारली, आम्ही चांगली प्रगती करत आहोत आणि काही गोष्टी सुरळीत व्हायला थोडा वेळ लागेल. निकोलसने उत्कृष्ट कामगिरी ( Pollard said Nicholas did great job ) केली. त्याने सातत्य दाखवले, तो युवा खेळाडू आहे आणि त्याने यापुढेही चांगली कामगिरी करावी अशी आमची इच्छा आहे. तो अजूनही शिकत आहे. विंडीजच्या कर्णधाराने त्याचा मुंबई इंडियन्सचा सहकारी सूर्यकुमार यादवचेही कौतुक ( Pollard praised Suryakumar Yadav ) केले.

पोलार्ड म्हणाला, सूर्या हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. मला त्याच्यासोबत मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली. तो चमकदार कामगिरी करत आहे. सर्व फलंदाज त्याच्याकडून शिकू शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.