ऑकलंड: भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने ( Fast bowler Jhulan Goswami ) न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात आणखी एक मोठा विक्रम केला आहे. शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळायला उतरताच, झुलन 200 वनडे सामने खेळणारी ( Jhulan Goswami 200th Matches ) भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या सामन्यापूर्वी केवळ भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने 200 हून अधिक एकदिवसीय सामने खेळले होते. 229 एकदिवसीय सामन्यांसह मिताली राज या यादीत अव्वल स्थानावर आहे.
-
𝗔 𝗗𝗼𝘂𝗯𝗹𝗲 𝗧𝗼𝗻 𝗧𝗼 𝗖𝗵𝗲𝗿𝗶𝘀𝗵! 🙌 🙌
— BCCI Women (@BCCIWomen) March 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Congratulations to the legendary #TeamIndia pacer @JhulanG10 as she plays her 2⃣0⃣0⃣th WODI! 👏 👏 #CWC22 | #INDvAUS pic.twitter.com/jQvP25FwoX
">𝗔 𝗗𝗼𝘂𝗯𝗹𝗲 𝗧𝗼𝗻 𝗧𝗼 𝗖𝗵𝗲𝗿𝗶𝘀𝗵! 🙌 🙌
— BCCI Women (@BCCIWomen) March 19, 2022
Congratulations to the legendary #TeamIndia pacer @JhulanG10 as she plays her 2⃣0⃣0⃣th WODI! 👏 👏 #CWC22 | #INDvAUS pic.twitter.com/jQvP25FwoX𝗔 𝗗𝗼𝘂𝗯𝗹𝗲 𝗧𝗼𝗻 𝗧𝗼 𝗖𝗵𝗲𝗿𝗶𝘀𝗵! 🙌 🙌
— BCCI Women (@BCCIWomen) March 19, 2022
Congratulations to the legendary #TeamIndia pacer @JhulanG10 as she plays her 2⃣0⃣0⃣th WODI! 👏 👏 #CWC22 | #INDvAUS pic.twitter.com/jQvP25FwoX
याआधी झुलनने या विश्वचषकातील शेवटच्या सामन्यात वनडे क्रिकेटमध्ये 250 बळी ( 250 wickets in ODI cricket ) पूर्ण केले होते. हा आकडा गाठणारी ती पहिली महिला गोलंदाज ठरली आहे. इतर कोणतीही महिला गोलंदाज तिच्या विक्रमाच्या जवळपासही नाही. आतापर्यंत जगातील कोणत्याही महिला गोलंदाजाने 200 बळी घेतलेले नाहीत.
मागील सामन्यात 250 बळी पूर्ण करणारी झुलन पहिली महिला क्रिकेटपटू ( Jhulan first female cricketer ) ठरली आणि या सामन्यासह तिने 200 सामने खेळलेल्या महिला क्रिकेटपटूंमध्ये ( Women cricketers playing 200 matches ) आपले नाव नोंदवले. मिताली राज सर्वात जास्त सामना खेळणारी क्रिकेटर आहे. तिने आतापर्यंत 234 सामने खेळले आहेत.
झुलनची क्रिकेट कारकीर्द -
झुलनने 6 जानेवरी 2002 साली इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्याने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा पासून आतापर्यंत झुलन भारतीय महिला संघाची नियमित खेळाडू राहिली आहे. तिने आपल्या वीस वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे. तसेच तिने आपल्या या कारकीर्दीत 350 जास्त विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात 250 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत, तर तिने कसोटीत 44 आणि टी-20 मध्ये 56 विकेट्स घेतल्या आहेत.