ETV Bharat / sports

विराट कोहलीचा 'चमचा' म्हटल्यावर भडकला इरफान पठाण, पलटून विचारला जबराट प्रश्न - virat kohli

इरफान पठाण याने विराट कोहलीचे कौतूक केले. तेव्हा एका यूझरने, पठाणला कौतूक करण्यासाठी विराटकडून पैसे दिले जात आहेत काय? असा प्रश्न विचारला. या यूझरला इरफानने चांगले फैलावर घेतले. तो म्हणाला, तुझ्या मनात दिसत नाही की, मी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचे कौतूक करावं.

irfan-pathan-gives-a-befitting-reply-to-a-troll-who-called-him-virat-kohli-chamcha

author img

By

Published : Jun 27, 2021, 4:15 PM IST

मुंबई - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा दारूण पराभव झाला. भारतीय संघाच्या या पराभवाला कर्णधार विराट कोहलीला जबाबदार धरत नेटीझन्सनीं विराटला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. या दरम्यान भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने समालोचन करताना विराटचे कौतूक केले होते. यामुळे नेटिझन्सनीं इरफानला देखील लक्ष्य केले आहे. एका तर इरफानला विराटचा 'चमचा' म्हटलं. यावर इरफानने रिप्लाय देत त्या यूझरची बोलती बंद केली.

इरफान पठाण याने विराट कोहलीचे कौतूक केले. तेव्हा एका यूझरने, पठाणला कौतूक करण्यासाठी विराटकडून पैसे दिले जात आहेत काय? असा प्रश्न विचारला. या यूझरला इरफानने चांगले फैलावर घेतले. तो म्हणाला, तुझ्या मनात दिसत नाही की, मी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचे कौतूक करावं.

  • So you don’t want me to praise the best player in the world??

    — Irfan Pathan (@IrfanPathan) June 22, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, भारतीय संघाचा अंतिम सामन्यात ८ गडी राखून पराभव झाला. भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात होते. परंतु, न्यूझीलंडच्या व्यूहरचनेत भारतीय संघ अडकला. भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात भारताचा डाव अवघ्या १७० धावांत ढेपाळला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर वेसण घालत एकाही फलंदाजाला मोठी खेळी करू दिली नाही. भारताने दिलेले सोपे लक्ष्य न्यूझीलंडने २ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण करत विजेतेपदला गवसणी घातली.

हेही वाचा - Tokyo Olympics : साजन प्रकाशने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला जलतरणपटू

हेही वाचा - IND VS ENG : मायकल वॉनने आपल्याच संघाचे टोचले कान, म्हणाला...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.