हैदराबाद : शोएब अख्तरची आता सोशल मीडियावर उपस्थिती दिसू ( Shoaib Akhtar Presence on Social Media ) लागली आहे. जिथे तो सामने डीकोड करतो. सामन्यांविषयीचे विश्लेषण पाहायला मिळते. विशेषत: पाकिस्तान संघाने त्याला एक मोठा फॉलोअर ( Pakistan Team has Earned Him a Big Following ) मिळवून दिला ( Camera Towards The Fans Standing Outside ) आहे. त्याच्या शेवटच्या पोस्टवर शाहरूख खान नावाचा चाहता होता. 47 वर्षीय शोएब त्याच्या कारमध्ये बसून खिडकीबाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांकडे कॅमेरा वळवताना दिसला. जिथे त्याने पाकिस्तानच्या संघाविषयी विचारपूस केली आणि सध्याच्या सेटअपमध्ये त्यांना कोणता बदल पाहायला आवडेल.
-
Awaam ki awaz. Pakistan cricket team ko mashwaray. Aur @iamsrk se mohabbat. pic.twitter.com/jRI2RGtxiu
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Awaam ki awaz. Pakistan cricket team ko mashwaray. Aur @iamsrk se mohabbat. pic.twitter.com/jRI2RGtxiu
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 7, 2022Awaam ki awaz. Pakistan cricket team ko mashwaray. Aur @iamsrk se mohabbat. pic.twitter.com/jRI2RGtxiu
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 7, 2022
चाहत्यांनी शोएबला दिला सल्ला : एका चाहत्याने, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या जागी मोहम्मद हॅरीस आणि फखर झमान यांना टॉप ऑर्डरमध्ये बदल करण्याची विनंती केली. जेणेकरून संघाच्या धावसंख्येला गती मिळावी. व्हिडीओच्या शेवटी उत्साही समूह व्हिडिओमध्ये स्वत:ची ओळख करून देताना दिसला, जिथे त्यांच्यापैकी एक होता. शाहरूख खान नाव आहे.
शोएबच्या चाहत्याने बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा डायलाॅग बोलून दाखवला : तो चाहता बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा खूप मोठा चाहता आहे. त्याने बादशाह चित्रपटातील संवाददेखील शोएबसमोर बोलून दाखवले. हा संवाद काही सेकंद चालला, तोपर्यंत अख्तरनेच "बेटा शाहरूख खान है, इतने लंबे डायलॉग नही बोलते" असे म्हणत त्याला थांबवत चाहत्यांबरोबर विनोद करीत या संवादाला पूर्णविराम दिला. त्यानंतर या पोस्टला 23.8k लाईक्स आणि 2172 रिट्विट्स मिळाले आहेत.
पाकिस्तानचा उपांत्य फेरीत प्रवेश : खेळाच्या आघाडीवर, नेदरलँड्सकडून दक्षिण आफ्रिकेच्या धक्कादायक पराभवानंतर पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उद्या पहिल्या उपांत्य फेरीत संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.