ETV Bharat / sports

Vijay Shankar Fifty in IPL 2023 : गुजरातने 'असा' घेतला ऐतिहासिक पराभवाचा बदला, विजय शंकरने झळकावले अर्धशतक

Vijay Shankar David Miller Video: गुजरात टायटन्सचा फलंदाज विजय शंकरने आयपीएलचा 39 वा सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे त्याने गुजरात संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. सामना जिंकल्यानंतर विजय शंकर आणि डेव्हिड मिलरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यांनी सामन्यासाठी केलेल्या नियोजनाबद्दल सांगितले.

Vijay Shankar Fifty in IPL 2023
विजय शंकरने झळकावले अर्धशतक
author img

By

Published : Apr 30, 2023, 3:01 PM IST

नवी दिल्ली : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएलचा 39 वा सामना जिंकला. या सामन्यात विजय शंकरने फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. त्यामुळे संघाला मजबूत धावसंख्या गाठता आली. याशिवाय डेव्हिड मिलर आणि शुभमन गिल यांनी वेगवान फलंदाजी केली. सामना जिंकल्यानंतर विजय शंकर आणि डेव्हिड मिलरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सामन्यादरम्यान त्यांचे काय नियोजन होते याची माहिती दोन्ही खेळाडू देत आहेत. या विजयानंतर गुजरात फ्रेंचायझी पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी राखून पराभव : 29 एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात अष्टपैलू विजय शंकरने 24 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी खेळली. यामुळे गुजरात संघाने या लीगमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांमध्ये सहावा विजय मिळवला असून 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. याशिवाय डेव्हिड मिलरने वेगवान फलंदाजी करताना 18 चेंडूत 32 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी शुबमन गिल 35 चेंडू खेळताना अर्धशतकापासून एक धाव कमी पडला. त्याने 49 धावांची खेळी खेळली.

ऐतिहासिक पराभवाचा बदला : इंडियन प्रीमियर लीगने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये विजय शंकर आणि डेव्हिड मिलर सामन्यादरम्यानचा अनुभव शेअर करत आहेत. प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 179 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी 17.5 षटकांत 3 गडी गमावून 180 धावांचे लक्ष्य सहज गाठले. या सामन्यात विजय शंकरने मॅचविनिंग इनिंग खेळताना 2 चौकार आणि 5 षटकार लगावत अर्धशतक ठोकले. अशाप्रकारे गुजरातने उलटसुलट सामन्यात कोलकात्याकडून झालेल्या ऐतिहासिक पराभवाचा बदला घेतला आहे.

विजय शंकर आणि डेव्हिड मिलरची अप्रतिम खेळी : लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात 41 धावांनी झाली. वृध्दिमान साहा 10 धावा करून रसेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पांड्याने दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. 20 चेंडूत 26 धावा करून पांड्याला हर्षित राणाने बाद केले. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार मारला. शुभमन गिलने 49 धावांच्या खेळीत 8 चौकार मारले. गुजरातने 93 धावांवर तिसरी विकेट गमावली. पण यानंतर विजय शंकर आणि डेव्हिड मिलर यांनी 87 धावांची सामना जिंकणारी भागीदारी केली आणि यादरम्यान जबरदस्त षटकार ठोकले. डेव्हिड मिलरने नाबाद 32 धावांच्या खेळीत 2 चौकार आणि 2 षटकार लगावले.

हेही वाचा : IPL 2023 : यशस्वी-ध्रुव आणि शिवम यांनी आयपीएलमध्ये केली शानदार फलंदाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.