ETV Bharat / sports

IPL 2023 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हिटमॅन हैदराबादमध्ये करणार आणखी एक विक्रम..! - राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अवघ्या 14 धावा करून 6000 धावांच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. याआधी आयपीएलमध्ये केवळ ३ खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे.

IPL 2023
रोहित शर्मा
author img

By

Published : Apr 18, 2023, 4:18 PM IST

हैदराबाद : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम खूप आवडते. रोहित शर्माने येथे अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत. रोहित शर्माचा आयपीएलमधील विक्रम पाहिला, तर आज तो हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर आणखी एक मोठा टप्पा गाठू शकतो. रोहित शर्माने आज आणखी 14 धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा चौथा खेळाडू बनेल.

  • Rohit Sharma in Hyderabad stadium:

    466 runs at an average of 38.83 & strike rate of 139.10 including 4 fifties.

    Captain needs 14 runs to complete 6000 runs in IPL - Hitman of World Cricket. pic.twitter.com/46lDuNJLPu

    — Johns. (@CricCrazyJohns) April 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रोहितने 226 डावांमध्ये 5986 धावा केल्या : रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या 231 सामन्यांच्या 226 डावांमध्ये 5986 धावा केल्या आहेत. 28 वेळा नाबाद राहिला, ज्यात एक शतक आणि 41 अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान रोहितने 529 चौकार आणि 247 षटकारही मारले आहेत. राजीव गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये रोहित शर्माने 38.83 च्या सरासरीने एकूण 466 धावा केल्या आहेत, ज्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

रोहित 6000 धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंमध्ये सामील होईल : येथे त्याचा स्ट्राइक रेट 139.10 आहे. त्यामुळेच रोहित शर्माला हे स्टेडियम खूप आवडत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आजही रोहित शर्मा येथे शानदार खेळी करेल आणि आयपीएलमध्ये 6000 धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंमध्ये सामील होईल अशी अपेक्षा आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत 6000 धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नरच्या नावाचा समावेश आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये 6844 धावा केल्या आहेत तर शिखर धवनने 6477 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 6109 धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्स संघाची स्थिती : सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये परतल्यामुळे मुंबई इंडियन्स संघाची स्थिती थोडी बरी वाटत आहे, पण आघाडीचे तीन फलंदाज एकत्र धावा करू शकलेले नाहीत. दुसरीकडे हॅरी ब्रूकने झळकावलेल्या शतकानंतर सलग दोन विजयांमुळे हैदराबाद संघाच्या खेळाडूंचे मनोबल उंचावले आहे. हॅरी ब्रूकचा सलामीवीर म्हणून वापर करून सनरायझर्सने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सलामीवीर ब्रूक आणि एडन मार्कराम यांना मधल्या फळीत मदत करण्यासाठी अभिषेक शर्माच्या पुनरागमनामुळे सनरायझर्सची मधली फळी मजबूत दिसत आहे.

हेही वाचा : IPL 2023 : मुंबईचा हैदराबादची विजयी मालिका खंडित करण्याचा प्रयत्न, मागील पराभवाचा घेणार बदला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.