मुंबई - काही परदेशी क्रिकेटपटूंनी आयपील खेळण्यास नकार दिलेला असला तरी बीसीसीआयने तितक्याच उत्साहाने या स्पर्धेचे आयोजन करण्याचे टरवले आहे. उर्वरित आयपीएल (IPL) स्पर्धा रोमांचक बनावी यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिध्द झाले नसले तरी ही स्पर्था १९ सप्टेंबर रोजी सुरू होणार असून १५ ऑक्टोबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार असल्याचे निश्तिच झाले आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय आणि अमीरात क्रिकेट बोर्ड यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठका चांगल्या पार पडल्या. उर्वरित स्पर्धा दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे यशस्वीपणे आयोजित करण्यात येईल असा भारतीय क्रिकेट मंडळाला पूर्ण विश्वास आहे.
-
Mr IPL is Back 😍#CSKvDC pic.twitter.com/LR7shDC53v
— IPL 2021 - #IPL2021 #IPL #IPL14 #IPLT20 (@CricketDailyIN) April 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mr IPL is Back 😍#CSKvDC pic.twitter.com/LR7shDC53v
— IPL 2021 - #IPL2021 #IPL #IPL14 #IPLT20 (@CricketDailyIN) April 10, 2021Mr IPL is Back 😍#CSKvDC pic.twitter.com/LR7shDC53v
— IPL 2021 - #IPL2021 #IPL #IPL14 #IPLT20 (@CricketDailyIN) April 10, 2021
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बोर्डांमधील चर्चा खरोखरच चांगलीच होती आणि ईसीबीने अगोदरच बीसीसीआयच्या टूर्नामेंट आयोजनाला मौखिक सहमती दिली होती. गेल्या आठवड्यातच अनेक गोष्टींवर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. बीसीसीआयला टूर्नामेंट पूर्ण करण्यासाठी २५ दिवसांचा अवधी हवा होता आणि तितका वेळ मिळाला आहे.
परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत मंडळाच्या सूत्रांनी सांगितले की, संवाद सुरू आहे आणि आम्हाला सकारात्मक निकालाची अपेक्षा आहे. या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. बहुतेक परदेशी उपलब्ध व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. जर यापैकी काही येणार नसतील तर त्यांच्याबद्दलचा आम्ही निर्णय घेऊ. परंतु अशी अपेक्षा आहे की उर्वरित सामन्यांसाठी बहुतेक परदेशी खेळाडू असतील.
हेही वाचा - आयर्नमॅन हार्दिक पाटील यांच्या घरावर पेट्रोल बाटल्यांच्या हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद