मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर ही स्पर्धा रद्द होईल की उर्वरित स्पर्धा पून्हा आयोजित करण्यात येईल, याबाबत सर्वांना उत्सूकता लागली होती. मात्र, ही उत्सूकता आता संपली असून क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान दुबई येथे करण्यात येणार आहे, याबाबतचे ट्वीट एएनआय या वृत्तसंस्थेने केले आहे.
![IPL latest news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11896983_ipl.jpg)
कोरोनामुळे स्थगित करण्यात आली होती स्पर्धा -
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव आणि काही संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर आयपीएल आणि बीसीसीआयने तातडीने बैठक घेत आयपीएलचा 14 हंगाम तत्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसेच इतरांच्या सुरक्षेबाबत बीसीसीआय तडजोड करू इच्छित नाही. भागधारकांची सुरक्षा, आरोग्य लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला, असल्याचे गव्हर्निंग काउंसिलने म्हटले होते.
हेही वाचा- राज्य सरकारचं ठरलं! दहावी-अकरावीसंदर्भात लवकरच शासन निर्णय काढणार