बेंगळुरू : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात बंगळूरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, लखनऊ सुपर जायंट्सने आरसीबीचा एका विकेटने रोमांचक पराभव केला. या पराभवासह आरसीबीचा संघ पुन्हा एकदा 200 हून अधिक धावा डिफेंड करण्यात अपयशी ठरला. या पराभवासह आरसीबीच्या नावे आणखी एक नकोसा विक्रम झाला आहे.
-
RCB are the only team to lose five times after setting a 200+ target in IPL.
— CricTracker (@Cricketracker) April 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
📸: IPL/BCCI#CricTracker #NicholasPooran #RCBvLSG pic.twitter.com/NhD65NeQvT
">RCB are the only team to lose five times after setting a 200+ target in IPL.
— CricTracker (@Cricketracker) April 10, 2023
📸: IPL/BCCI#CricTracker #NicholasPooran #RCBvLSG pic.twitter.com/NhD65NeQvTRCB are the only team to lose five times after setting a 200+ target in IPL.
— CricTracker (@Cricketracker) April 10, 2023
📸: IPL/BCCI#CricTracker #NicholasPooran #RCBvLSG pic.twitter.com/NhD65NeQvT
200 हून अधिक धावा करून 5 व्यांदा पराभव : लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा ठरत होता. परंतु निकोलस पूरनच्या फलंदाजीने सामन्याचे चित्र पालटले आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 200 हून अधिक धावा करूनही 5 व्यांदा पराभव पत्करावा लागला. याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने 4 वेळा 200 हून अधिक धावा करून सामना गमावला आहे. काल लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्या 4 षटकात 3 बळी घेतल्यानंतरही संघाला सामन्यावर पकड मिळवता आली नाही.
-
Match aur dil dono jeetna koi humse seekhe 😎🔥#RCBvLSG | #IPL2023 | #LucknowSuperGiants | #LSG | #GazabAndaz pic.twitter.com/mXY1b0ZXck
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Match aur dil dono jeetna koi humse seekhe 😎🔥#RCBvLSG | #IPL2023 | #LucknowSuperGiants | #LSG | #GazabAndaz pic.twitter.com/mXY1b0ZXck
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 10, 2023Match aur dil dono jeetna koi humse seekhe 😎🔥#RCBvLSG | #IPL2023 | #LucknowSuperGiants | #LSG | #GazabAndaz pic.twitter.com/mXY1b0ZXck
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 10, 2023
लखनऊ गुणतालिकेत अव्वल स्थानी : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करूनही सामने गमावलेल्या आयपीएल संघांमध्ये अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्ज आहे. यानंतर पंजाब किंग्स आणि केकेआरचा क्रमांक लागतो. तर मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांनी 200 धावा केल्यानंतर एकही सामना गमावलेला नाही. या विजयासह लखनऊ सुपर जायंट्स पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचला असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ सातव्या क्रमांकावर घसरला आहे.
लखनऊने शेवटच्या चेंडूवर जिंकला सामना : या सामन्यात 213 धावांचे लक्ष्य गाठताना 3 गडी लवकर बाद झाल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या मार्कस स्टॉइनिस आणि केएल राहुल यांच्यात 40 चेंडूत 76 धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. त्यानंतर निकोलस पूरन आणि आयुष बदोनी यांच्यात 35 चेंडूत 84 धावांची भागीदारी झाली. या भागीदारीमुळे सामना अखेरपर्यंत रंगला. मात्र अखेरच्या षटकात निकोलस पूरन आणि आयुष बदोनी बाद झाल्यानंतर हा सामना पुन्हा रोमांचक झाला. अखेर शेवटच्या चेंडूवर अतिरिक्त धाव घेत लखनऊ सुपर जायंट्सने सामना जिंकला.
हेही वाचा : IPL 2023 : आरसीबीचा लखनौने एक विकेट ने केला पराभव , मॅच मधे आणली शेवटच्या बाॅल पर्यंत रंगत