सिडनी : सिडनी येथे न्यूझीलंड आणि पाकिस्तान ( Pakistan Beat New Zealand by 7 Wickets ) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा ( First Semi Final of T20 World Cup 2022 ) पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ( NZ have Won Toss and Elected to Bat First ) घेतला. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड ( New Zealand Led by Kane Williamson ) आणि बाबर आझमच्या ( Pakistan Led by Babar Azam ) नेतृत्वाखालील पाकिस्तान (PAK vs NZ) यांच्यात आज T20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना झाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 विकेट गमावून 152 रन ( New Zealand Scored 152 for 4 in 20 Overs ) बनवले, पाकिस्तानसाठी 153 धावांचे ( New Zealand Setting a Target 153 For Pakistan ) लक्ष्य ठेवले होते.
-
Cometh the hour, cometh the man!
— ICC (@ICC) November 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
What a knock from Babar Azam in the semi-final clash 👏#T20WorldCup | #NZvPAK pic.twitter.com/SGkg5xD18Q
">Cometh the hour, cometh the man!
— ICC (@ICC) November 9, 2022
What a knock from Babar Azam in the semi-final clash 👏#T20WorldCup | #NZvPAK pic.twitter.com/SGkg5xD18QCometh the hour, cometh the man!
— ICC (@ICC) November 9, 2022
What a knock from Babar Azam in the semi-final clash 👏#T20WorldCup | #NZvPAK pic.twitter.com/SGkg5xD18Q
पाकिस्तानी फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पिचवर धावसंख्येचा पाठलाग : पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी शानदार सुरुवात करीत पाकिस्तानी संघाची धावसंख्या उभारण्यात मोठे योगदान दिले. कर्णधार बाबर आझमला सूर गवसल्यानंतर त्याने जोरदार फटकेबाजी करीत 42 चेंडूत 53 धावा केल्या. तर मोहम्मद रिझवानने 43 चेंडूत 57 धावा केल्या. यांनी पाकिस्तानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
-
A sensational performance from Pakistan in the knockout game ⚡#T20WorldCup | #NZvPAK | 📝: https://t.co/LSzHXLy12f pic.twitter.com/fTq6RoaLMu
— ICC (@ICC) November 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A sensational performance from Pakistan in the knockout game ⚡#T20WorldCup | #NZvPAK | 📝: https://t.co/LSzHXLy12f pic.twitter.com/fTq6RoaLMu
— ICC (@ICC) November 9, 2022A sensational performance from Pakistan in the knockout game ⚡#T20WorldCup | #NZvPAK | 📝: https://t.co/LSzHXLy12f pic.twitter.com/fTq6RoaLMu
— ICC (@ICC) November 9, 2022
पाकिस्तानचा विजयावर सहज शिक्कामोर्तब : बाबर आणि रिझवान यांनी शानदार शतकी खेळींची भागीदारी करीत पाकिस्तानच्या चिंता कमी केल्या. त्यामुळे पाकिस्तानला हा सहज विजय निश्चित करता आला. ही जोडी आपापल्या अर्धशतकानंतर बोल्टद्वारे यांची विकेट पडली, पण तोपर्यंत न्यूझीलंडच्या हातातून डाव निसटून गेला होता. रिझवान बाद झाल्यानंतर हरिसने जबाबदारी स्वीकारली आणि अखेरीस पाच चेंडू बाकी असताना पाकिस्तानने त्यावर आरामात शिक्कामोर्तब केले. रिझवान 43 चेंडूत 57 धावांवर बाद झाला. बोल्टच्या गोलंदाजीवर फिलिप्सच्या हाती रिझवान झेलबाद झाला.
न्यूझीलंड संघाची कामगिरी : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली असून आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) पहिला सेमीफायनल सामना खेळला जात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजीचा (New Zealand vs Pakistan) निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना केवळ 152 धावांपर्यंतच मजल मारता आली आहे. यावेळी कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल या दोघांनी एकहाती झुंज दिल्यामुळं धावसंख्या इथवर पोहोचली आहे.
-
New Zealand have set a target of 153 for Pakistan 🏏
— ICC (@ICC) November 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Will it be enough?#T20WorldCup | #NZvPAK | 📝: https://t.co/LSzHXLyyRN pic.twitter.com/G2gTK1hTWK
">New Zealand have set a target of 153 for Pakistan 🏏
— ICC (@ICC) November 9, 2022
Will it be enough?#T20WorldCup | #NZvPAK | 📝: https://t.co/LSzHXLyyRN pic.twitter.com/G2gTK1hTWKNew Zealand have set a target of 153 for Pakistan 🏏
— ICC (@ICC) November 9, 2022
Will it be enough?#T20WorldCup | #NZvPAK | 📝: https://t.co/LSzHXLyyRN pic.twitter.com/G2gTK1hTWK
पाकिस्तानी गोलंदाजांची कामगिरी : पाकिस्तान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत न्यूझीलंडच्या संघाला 152 पर्यंत रोखण्यात यश मिळवले आहे. एक रनआउट मिस सोडला, तर पाकिस्तानाने मैदानात उत्तम कामगिरी केली. शाहीनने फिन ऍलनची पहिली विकेट घेऊन पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. पाकिस्तानकडून शाहीन अफ्रिदी याने दोन विकेट घेतल्या तर नवाझने एक विकेट घेतली.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद नवाज, मोहम्मद हारिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.
न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (wk), केन विल्यमसन (c), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
हे दोन संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत (ODI आणि T20) तीनदा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानने तिन्ही वेळा विजय मिळवला आहे.
वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड-पाकिस्तान तीन वेळा आमने-सामने
- एकदिवसीय विश्वचषक १९९२ च्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडचा प्रथमच पराभव केला होता.
- यानंतर 1999 च्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानचा संघ दुसऱ्यांदा न्यूझीलंडशी भिडला. यावेळीही किवी संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
- त्याचवेळी, 2007 च्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ तिसऱ्यांदा आमनेसामने आला होता. यावेळीही पाकिस्तान संघ विजयी ठरला. अशाप्रकारे टी-२० विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत किवी संघ पाकिस्तानला पराभूत करू शकला नाही.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड हेड टू हेड : 28 टी-20 सामने न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळले गेले आहेत. याबाबतीत पाकिस्तानचा रेकॉर्ड खूपच चांगला आहे, 17 वेळा पाकिस्तानने बाजी मारली आहे, तर 11 वेळा न्यूझीलंडने सामना जिंकला आहे.
सामन्याच्या दिवशी आकाश निरभ्र : आज सामन्याच्या दिवशी आकाश निरभ्र असल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या सरकारी हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी सिडनीमध्ये आकाश निरभ्र असेल. तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. २० टक्के पाऊस अपेक्षित आहे. अशा स्थितीत पावसामुळे सामन्यावर परिणाम होण्याची अपेक्षा नाही. सिडनी वेळेनुसार, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला उपांत्य सामना संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाईल. AQ Weather च्या अहवालानुसार, सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता नाही.