लखनौ : मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल IPL2023 च्या मोसमात दमदार कामगिरी केली आहे. सध्या मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आतुर झाला आहे. मात्र मुंबई संघाची डोकेदुखी वाढवणारी एक घटना पुढे आली आहे. मुंबई संघाचा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरच्या हाताला श्वानाने चावा घेतला आहे. लखनौमध्ये हा प्रसंग घडल्याची माहिती अर्जुनच्यावतीने मुंबई इंडियन्सकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाच्या अडचणीत भर पडली आहे.
-
Mumbai se aaya humara dost. 🤝💙 pic.twitter.com/6DlwSRKsNt
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai se aaya humara dost. 🤝💙 pic.twitter.com/6DlwSRKsNt
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 15, 2023Mumbai se aaya humara dost. 🤝💙 pic.twitter.com/6DlwSRKsNt
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 15, 2023
बोटाला चावला श्वान : सुप्रसिद्ध फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि मुंबईचा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आयपीएल 2023 खेळत आहे. अर्जुनला लखनौमध्ये कुत्र्याने चावा घेतला. खुद्द अर्जुन तेंडुलकरने लखनऊ सुपर जायंट्सच्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. त्याला कोणत्या श्वानाने कुठे चावा घेतला याची माहिती देण्यात आली नाही. अर्जुन तेंडुलकरच्या म्हणण्यानुसार त्याच्या बोटाला श्वानाने चावा घेतला आहे.
लखनऊच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला व्हिडिओ : अर्जुन तेंडुलकरला श्वान चावल्याचा व्हिडिओ लखनऊ सुपरजायंट्सच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन तेंडुलकर अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर आपल्या सहकाऱ्यांना मिठी मारत आहे. यादरम्यान सहकारी क्रिकेटपटू त्याला बोटाला काय झाले असे विचारत आहेत. त्यावर अर्जुन तेंडुलकरने त्याला काल श्वानाने बोट चावल्याचे सांगितले. कोणतीही मोठी दुखापत झालेली नसल्याचेही त्याने यावेळी स्पष्ट केले. लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने सोमवारी अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर सरावही केला होता. हा संघ हॉटेल ताजमहाल येथे थांबला आहे. अशा परिस्थितीत अर्जुनला श्वानांनी स्टेडियममध्ये चावा घेतला की हॉटेलमध्ये, याची माहिती या व्हिडिओद्वारे स्पष्ट होत नाही. हॉटेलमध्ये कुणाच्यातरी पाळीव श्वानासोबत खेळताना त्याला चावा घेतला असावा, असे सूत्रांचे मत आहे.
ट्विटरवर चाहते करत आहेत विचारणा : विशेष म्हणजे हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट होताच चाहत्यांनी अर्जुन तेंडुलकरला श्वानांनी चावा घेतला आहे का, अशी विचारणा सुरू केली. मात्र या संदर्भात लखनौ सुपर जायंट्सकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. अर्जुन तेंडुलकरला श्वान कुठे चावला? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याने या घटनेतील सस्पेंस वाढला आहे.
हेही वाचा -