नवी दिल्ली : आयपीएल 2023 च्या 50 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 7 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यादरम्यान आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि दिल्लीचा सलामीवीर फिल सॉल्ट यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. या सामन्यात सिराज गोलंदाजी करत होता. त्यावेळी आपल्याला चौकार मारलेला पाहून सिराजला राग आला. दरम्यान, दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वादावादी झाली. दिल्ली धावांचा पाठलाग करत असताना पॉवर - प्लेच्या शेवटच्या षटकात ही घटना घडली. तेव्हापासून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
-
That's really unnecessary attitude from Siraj| #RCBvDC #MohammedSiraj pic.twitter.com/8tuxy2tIJR
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) May 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">That's really unnecessary attitude from Siraj| #RCBvDC #MohammedSiraj pic.twitter.com/8tuxy2tIJR
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) May 6, 2023That's really unnecessary attitude from Siraj| #RCBvDC #MohammedSiraj pic.twitter.com/8tuxy2tIJR
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) May 6, 2023
पंचांनी केली मध्यस्थी : मोहम्मद सिराज आणि फिल सॉल्ट यांच्यातील भांडणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सिराजचा राग स्पष्ट दिसत आहे. सिराज फिल सॉल्टकडे बोट दाखवत काहीतरी बोलत असल्याचे दिसत आहे. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंमधील वाद वाढल्यानंतर पंच आणि दिल्ली संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी प्रकरण शांत केले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात सिराजने 2 षटके टाकली आणि एकही विकेट न घेता 28 धावा दिल्या. यामुळे सिराज अस्वस्थ होऊ लागला आणि त्याचा संयम सुटला. त्याचवेळी फिल सॉल्टने सिराजच्या चेंडूवर सलग 2 षटकार आणि 1 चौकार लगावला. यानंतर सिराजने बॉल टाकला तेव्हा अंपायरने त्याला वाईड बॉल घोषित केले.
वादात अखेर क्रिकेटचा विजय : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा हिरो ठरलेल्या फिल सॉल्टने या सामन्यात तुफानी फलंदाजी केली. सॉल्टने 45 चेंडूत 87 धावांची धडाकेबाज खेळी केली. 193.33 च्या स्ट्राईक रेटने खेळताना त्याने 8 चौकार आणि 6 षटकार मारले. फिल सॉल्टला या कामगिरीच्या आधारे सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीवर 20 चेंडू शिल्लक असताना 7 गडी राखून विजय मिळवला. सामना संपल्यानंतर मोहम्मद सिराजनेही फिल सॉल्टला मिठी मारून शानदार खेळी केल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. अशा प्रकारे दोन खेळाडूंच्या वादात अखेर क्रिकेटचा विजय झाला.