दूबई - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० स्पर्धा 2021 मधील 45 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द पंजाब किंग्ज यांच्यात झाला. दोन्ही संघासाठी विजय महत्त्वाचा होता. पंजाबने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने 166 धावांचे लक्ष्य पंजाबसमोर ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करत पंजाबने पाच गडी राखून सामना आपल्या नावावर केला.
केकेआरकडून वेंकटेश अय्यरने सर्वाधिक 67 धावा काढत संघाची मजबूत सुरूवात करून दिली. त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा यांनी चांगली सलामी देत संघाला 165 धावांपर्यंत पोहोचवू दिले. तर पंजाबकडून अर्शदिप सिंग याने तीन तर रवी बिश्नोई याने दोन गडी बाद केले. पंजाबने लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली. कर्णधार के.एल. राहूलने सर्वाधिक 67 धावा काढल्या. तर त्याच्या सोबतीला असणाऱ्या मयंक अग्रवालने 47 धावा काढत संघाची स्थिती मजबूत केली. शेवटच्या षटकांमध्ये शाहरूख खानने तडाखेबाज फलंदाजी करत केवळ नऊ चेंडूत 22 धावा काढल्या आणि संघाला विजयी केले. पंजाबने हा सामना तीन चेंडू आणि पाच गडी राखून जिंकला.
केकेआर संघाने या स्पर्धेत एकूण 11 सामने खेळले असून 5 सामने जिंकून 10 गुण मिळवले आहेत. ‘आयपीएल’च्या पूर्वार्धात त्यांनी अवघ्या दोनच लढती जिंकल्या होत्या.
के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जच्या खात्यात ११ सामन्यानंतर आठ गुण आहेत. गेल्या तिन्ही सामन्यांत फलंदाजांचीत हा संघ अपयी ठरला आहे. त्यामुळे आजचा सामना ते कसे खेळतात हे पाहणे रंजक ठरेल.
कोलकाता नाईट रायडर्स संघातील आंद्रे रसेल याला दुखापतीमुळे आज बाहेर थांबावे लागेल. तर पंजाब संघातील ख्रिल गेलने आयपील सोडली असून तो यापुढे उपलब्ध नसणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ -
शुभमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, इवोइन मॉर्गन, नितीश राणा, दिनेश कार्तिक,सुनिल नारायणी, टीम सौथी, शिवम मावी, टीम सेफर्ट, वरुण चक्रवर्ती.
पंजाब किंग्जचा संघ
के एल राहुल, मयंक अग्रवाल, एडन मार्कम, निकोलस पोरन, शाहरुख खान, दीपक हुडा, फॅबियन एलन, नाथन एलिस, मोहम्मद शामी, रवी बिश्नोई, अर्शदिप सिंग.