ETV Bharat / sports

IPL 2023 : आरसीबीने मुंबई इंडियन्सचा 8 विकेट्सने उडवला धुव्वा ; विराट, डु प्लेसिसने ठोकले धडाकेबाज अर्धशतक - आरसीबीने मुंबई इंडियन्सचा पराभव केला

आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सचा 8 विकेट्सने पराभव केला. बंगळुरूने मुंबईचे 172 धावांचे आव्हान विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसच्या फलंदाजीच्या जोरावर सहजरित्या पूर्ण केले.

RCB vs MI
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
author img

By

Published : Apr 2, 2023, 12:29 PM IST

Updated : Apr 3, 2023, 7:05 AM IST

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 8 गडी राखून पराभव करत यंदाच्या आयपीएलची विजयी सुरुवात केली आहे. विराट कोहली बंगळुरूच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तो 49 चेंडूत 82 धावा काढून नाबाद राहिला. कर्णधार फाफ डु प्लेसिसनेही 43 चेंडूत 73 धावांची शानदार खेळी केली. या दोघांच्या शानदार भागिदारीच्या बळावर आरसीबीने मुंबईने दिलेले 172 धावांचे आव्हान 17 व्या षटकातच पूर्ण केले.

तिलक वर्माने मुंबईला सावरले : नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात डळमळीत झाली. 20 धावांवर मुंबईने आपल्या 3 विकेट गमावल्या होत्या. परंतु मुंबई इंडियन्सचा डावखुरा फलंदाज तिलक वर्माने प्रथम आपल्या संघाचा डाव सांभाळला आणि नंतर शेवटच्या षटकात आक्रमक फलंदाजी करत धावसंख्या 171 पर्यंत पोहोचवली. त्याने 46 चेंडूत नाबाद 84 धावांची धडाकेबाज खेळी केली. या दरम्यान त्याने 4 षटकार आणि 9 चौकार ठोकले. बंगळुरूसाठी कर्ण शर्माने 4 षटकात 32 धावा देत 2 बळी घेतले.

आरसीबीची फलंदाजी मजबूत : 2009 च्या फायनलमध्ये आरसीबीला डेक्कन चार्जर्स हैदराबाद कडून पराभवाचा सामना करावा लागला होता. 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईने त्यांचा पराभव केला होता. तर 2016 च्या फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत होऊन आरसीबी दुसऱ्या स्थानी राहिली होती. आरसीबीच्या फलंदाजीत खूप विविधता आहे. त्यांच्याकडे विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिससारखे धडाकेबाज फलंदाज आहेत. तर मुंबईच्या संघातही कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशनसारखे दर्जेदार भारतीय फलंदाज आहेत.

हेड टू हेड : दोन्ही संघांमधील गेल्या पाच सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वरचष्मा राहिला आहे. आरसीबीने पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. तर मुंबई एका सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी झाला आहे. या दोघांमधील शेवटचा सामना आयपीएल 2022 मध्ये 9 एप्रिल रोजी झाला होता. या सामन्यात आरसीबीने मुंबईवर 7 गडी राखून विजय मिळवला होता. 2022 च्या आयपीएलमध्ये बंगलोरचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला, तर मुंबई तळाच्या स्थानी होता.

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, हर्षल पटेल, आकाश दीप, वानिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज ; मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, कॅमेरून ग्रीन, रमणदीप सिंग, जोफ्रा आर्चर, हृतिक शोकीन, संदीप वॉरियर, जेसन बेहरेनडॉर्फ.

हेही वाचा : IPL 2023 Today Fixtures : आज राजस्थान समोर हैदराबादचे आव्हान, जाणून घ्या कोणाचे पारडे आहे जड

Last Updated : Apr 3, 2023, 7:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.