हैदराबाद : गेल्या चार वर्षापासून विराट कोहलीने शतक झळकावले नसल्याने त्याच्यावर प्रचंड टीका करण्यात येत होती. मात्र विराट कोहलीचा झंझावात हैदराबादच्या सामन्यात त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळाला. तब्बल चार वर्षापासूनची शतकाची वाट पाहणाऱ्या विराट कोहलीच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली. विराट कोहलीने आपले आयपीएलमधील सहावे शतक झळकावत हैदराबादच्या नवाबांवर छानदार विजय मिळवला. त्यामुळे हैदराबाद संघातील हेनरिक क्लासेनने झळकावलेले वादळी शतक फिके पडले. विराटचे हे या हंगामातील पहिलेच शतक ठरले आहे. सहावे शतक झळकावत विराट कोहलीने ख्रिस गेलची बरोबरी केली आहे.
विराट कोहलीने 62 चेंडूत झळकावले शतक : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सलामीला खेळताना विराट चांगलाच फॉर्मात होता. मात्र आयपीएलमधील त्याच्या संथ सुरुवातीमुळे त्याच्यावर टीका झाली होती. गुरुवारी रात्री विराटने 62 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण करत त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये असला तरी त्याचा स्ट्राइक रेट मधल्या षटकांमध्ये कमी होत आहे. विराट कोहलीने पॉवर प्लेवर वर्चस्व गाजवण्याबरोबरच मधल्या षटकांमध्ये चांगला खेळ करत आनंद लुटला. त्यानंतर विराट कोहलीने 18व्या षटकात 62 चेंडूत शतक ठोकले. मात्र अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 18 व्या षटकात विराट कोहलीला बाहेरचा रस्ता दाखवला.
घरच्या मैदानावर नवाबांचा पराभव : गुरुवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघादरम्यान सामना खेळवण्यात आला. आपल्या घरच्या मैदानावर खेळताना हैदराबादच्या नवाबांना पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादचा धडाकेबाज फलंदाज हेनरिक क्लासेनच्या शतकामुळे या सामन्यात चांगलीच रंगत आणली. मात्र त्यानंतर विराट कोहलीने हेनरिकच्या या वादळी शतकावर पाणी फेरले.
जिंकण्यासाठी 187 धावांचे लक्ष्य : प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने 186 धावा पटकावल्या. हैदरबादच्या हेनरिक क्लासेनने वादळी खेळी करत शतक झळकावले. मात्र त्यानंतर इतर फलंदाजांना धावसंख्या जमवता आली नाही. त्यामुळे हैदराबाद संघाने आरसीबीला 187 धावांचे लक्ष्य दिले. आरसीबीचे सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि डू प्लेसिसने जोरदार फलंदाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. आरसीबीने 6 षटकात 64 धावा केल्यानंतर मयंक डागरने अप्रतिम झेल घेतला, मात्र दुर्दैवाने नो बॉल असल्याने आरसीबीच्या फलंदाजाला जीवदान मिळाले. त्यानंतर आरसीबीच्या सलामीच्या फलंदाजांनी 150 भागिदारी केली. अखेर भुवनेश्वर कुमारने विराट कोहलीला 100 धावांवर तंबूत पाठवले.
हेही वाचा -