बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलचा 20 वा सामना आज बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीने दिल्लीवर 23 धावांनी विजय मिळवला आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वेन पार्नेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार व्यशक ; दिल्ली कॅपिटल्स - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिशेल मार्श, यश धूल, मनिष पांडे, अक्षर पटेल, अमन हकिम खान, ललित यादव, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, अॅनरिच नॉर्किया, मुस्तफिजूर रहमान.
इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये आज दोन सामने होणार आहेत. पहिल्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ दिल्ली कॅपिटल्सशी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भिडतो आहे. उभय संघांमधील हा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण दिल्लीचा संघ गेल्या 4 सामन्यांपासून सातत्याने पराभूत होत असून या मोसमात त्यांनी अद्याप आपल्या विजयाचे खाते उघडले नाही. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध विजय मिळवल्यानंतर त्यांना सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हेड टू हेड : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आतापर्यंत एकूण 28 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये बंगळुरू संघाने 17 सामने जिंकले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सने केवळ 10 सामने जिंकले आहेत. एका सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यांचे रेकॉर्ड पाहिल्यास, येथे या संघांमध्ये एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये आरसीबीने 6 सामने जिंकले आहेत, तर 4 सामन्यांत त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे.
हे ही वाचा : Matthew Hayden praises Shubman Gill : शुभमन जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवणार - मॅथ्यू हेडन