ETV Bharat / sports

IPL 2023 : एकतर्फी सामन्यात पंजाब किंग्जचा लखनौ कडून 56 धावांनी पराभव - लखनऊ सुपर जायंट्स

मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर पंजाब किंग्जचा लखनौने 56 धावांनी पराभव केला. लखनौने शानदार फलंदाजी करत पंजाब समोर 20 षटकांत 258 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जला 20 षटकांत केवळ 201 धावाच जोडता आल्या आणि पंजाबला सामना गमवावा लागला.

Punjab Kings vs Lucknow Super Giants
पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
author img

By

Published : Apr 28, 2023, 7:32 PM IST

Updated : Apr 29, 2023, 12:28 AM IST

मोहाली : आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली आणि पंजाबला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. मार्कस स्टॉइनिसच्या पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटजवळ उभ्या असलेल्या शिखर धवनने क्रुणालचा झेल घेतला. पॉवर प्लेदरम्यान पंजाब किंग्जची दुसरी विकेट प्रभासिमरन सिंगच्या रुपाने पडली. नवीन-उल-हकच्या चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर प्रभासिमरनला स्क्वेअर लेगवर डीआर सॅम्सने झेलबाद केले.

अथर्वच्या 36 चेंडूत 66 धावा : पंजाबची तिसरी विकेट सिकंदर रझाच्या रूपाने पडली. यश ठाकूरच्या 12व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सिकंदरने 22 चेंडूत 36 धावा केल्या आणि क्रुणालने डीप पॉईंटवर त्याचा झेल घेतला. पंजाबची चौथी विकेट अथर्व तावडेच्या रूपाने पडली. रवी विश्नोईच्या 13व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अथर्व 36 चेंडूत 66 धावा करून बाद झाला. सॅम करन २१ धावा करून बाद झाला. आयुष बडोनीच्या चेंडूवर त्याला नवीन-उल-हकने झेलबाद केले. नवीनची ही दुसरी विकेट आहे. त्याने प्रभासिमरन सिंगलाही बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जला 20 षटकांत केवळ 201 धावाच जोडता आल्या आणि ते सर्वबाद झाले. पंजाबने हा सामना 56 धावांनी गमावला.

लखनौची उत्कृष्ट फलंदाजी : तत्पूर्वी, लखनऊची पहिली विकेट केएल राहुलच्या रूपाने पडली. रबाडाच्या चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर केएल राहुलला शाहरुख खानने लाँग ऑनवर झेलबाद केले. लखनौची दुसरी विकेट काइल मेयर्सच्या रूपाने पडली. रबाडाच्या सहाव्या षटकातील ५व्या चेंडूवर मिडऑनला धवनने झेल घेतला. यासह रबाडाला आणखी एक यश मिळाले. मेयर्सने 24 चेंडूत 54 धावा केल्या.

आयुषच्या २४ चेंडूत ४३ धावा : यानंतर लखनऊची तिसरी विकेट आयुष बडोनीच्या रूपाने पडली, लिव्हिंगस्टनच्या १३व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर आयुषने स्वीप करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू स्क्वेअर लेगवर आर चहरकडे गेला. कॅच आऊट झाला आणि आयुष २४ चेंडूत ४३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

  • For his bowling figures of 4/37 in 3.5 overs, Yash Thakur is our Top Performer from the second innings.

    A look at his bowling summary here 👇#TATAIPL pic.twitter.com/fJUkjoGHgJ

    — IndianPremierLeague (@IPL) April 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लखनऊची वादळी फलंदाजी : सलामीवीर काइल मेयर्सने 24 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. आयुष त्याला बदोनीने उत्तम साथ दिली. त्याने 24 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या मार्कस स्टॉयनीसने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने 40 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने धुवांधार 72 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये निकोलस पूरनने उरलेली सर्व कसर भरून काढली. त्याने 19 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ताबडतोब 45 धावा केल्या. पंजाबकडून कागिसो रबाडाने 4 षटकांत 52 धावा देत 2 विकेट घेतल्या.

पंजाब किंग्ज संघ: अथर्व तायडे, शिखर धवन (कर्णधार), सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कागिसो रबाडा, राहुल चहर, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग ; इम्पॅक्ट प्लेअर - प्रभसिमरन सिंग, मोहित राठी, ऋषी धवन, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत ब्रार.

लखनऊ सुपरजायंट्स संघ: के. एल. राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बदोनी, नवीन - उल - हक, रवी बिश्नोई, आवेश खान, यश ठाकूर ; इम्पॅक्ट प्लेअर - कृष्णप्पा गौथम, डॅनियल सॅम्स, प्रेरक मंकड, अमित मिश्रा, मार्क वुड.

पंजाबचा कर्णधार शिखर धवन : आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. माझा खांदा आता चांगला आहे. मी वेदनामुक्त आहे. आम्ही सध्या आनंदी आहोत. आमचे 7 सामने बाकी आहेत आणि त्यापैकी आमचा बहुतेक जिंकण्याचा विचार आहे. आमच्या संघात दोन बदल आहेत - शॉर्टच्या जागी सिकंदर रझा संघात आला आहे, आणि एक वेगवान गोलंदाज आज पदार्पण करेल असे सुरवातीलाच सांगितले होते.

लखनऊचा कर्णधार के. एल. राहुल : मी जेव्हाही खेळतो तेव्हा नेहमीच मोटीव्हेटेड असतो. या वातावरणाशी मी बराच परिचित आहेत. ही एक चांगली विकेट आहे. रात्री दव हा एक मोठा निर्णायक घटक बनतो. म्हणूनच येथे संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याला प्राधान्य देतात. आम्ही तीच टीम खेळवणार आहोत. असे सांगितले होते.

हे ही वाचा : Wrestlers protest at Jantar Mantar : लैंगिक छळाच्या विरोधात भारतीय कुस्तीपटूंचा निषेध सुरूच, नीरज चोप्रानेही कुस्तीपटूंना दिली साथ

Last Updated : Apr 29, 2023, 12:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.