ETV Bharat / sports

IPL 2023 : लखनऊमध्ये पावसामुळे सामना रद्द, दोन्ही संघांना मिळाला एक-एक गुण - चेन्नई सुपर किंग्ज

लखनऊमध्ये सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा सामना रद्द करण्यात आला आहे. यानंतर दोन्ही संघांना दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला आहे.

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
author img

By

Published : May 3, 2023, 3:57 PM IST

Updated : May 3, 2023, 7:32 PM IST

लखनऊ : आयपीएल 2023 मध्ये आज लखनऊ सुपर जायंट्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होता. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. मात्र पावसामुळे लखनऊच्या पहिल्या डावादरम्यानच सामना रद्द करण्यात आला आहे. लखनऊची टीम 19.2 षटकांनंतर खेळू शकली नाही. 19.2 षटकांत लखनऊने 7 गड्यांच्या मोबदल्यात 125 धावा केल्या होत्या.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग 11) : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश तीक्षा ; इम्पॅक्ट प्लेअर्स - अंबाती रायुडू, मिच सँटनर, एस सेनापती, शेख रशीद, आकाश सिंग

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग 11) : काइल मेयर्स, मनन वोहरा, करण शर्मा, आयुष बदोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृणाल पंड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौथम, नवीन - उल - हक, रवी बिश्नोई, मोहसिन खान ; इम्पॅक्ट प्लेअर्स - क्विंटन डी कॉक, दीपक हुड्डा, डॅनियल सॅम्स, यश ठाकूर, प्रेरक मंकड.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी : आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. विकेट अंडर कव्हर्स होती आणि ती थोडी अवघड दिसते. म्हणून आम्ही प्रथम गोलंदाजी करू. तुम्हाला सर्व परिस्थिती आणि ठिकाण पाहावे लागेल. दीपक चहर फिट झाला आहे. तो आकाश सिंगच्याजागी टीममध्ये आला आहे. बाकीची टीम तशीच आहे. हे माझे शेवटचे आयपीएल आहे हे तुम्ही ठरवले आहे, मी नाही. (स्मित)

लखनऊचा कर्णधार कृणाल पंड्या : आम्हाला प्रथम फलंदाजीच करायची होती. फलंदाज मैदानावर येऊन व्यक्त होऊ शकतात. केएलचे बाहेर जाणे आमच्यासाठी मोठे नुकसान आहे. तो एक दर्जेदार खेळाडू आहे. मात्र त्याच्या जाण्याने दुसऱ्यांना संधी निर्माण होते आहे. आमचे मनोबल खूप उंच आहे. आम्ही काही सकारात्मक क्रिकेट खेळण्याचा विचार करत आहोत. मनन वोहरा आणि करण शर्मा टीममध्ये आले आहेत.

हेही वाचा : IPL 2023: विराटने पाया पडणाऱ्या तरुणाला मारली मिठी तर गौतम गंभीरला भिडला; सामनाधिकाऱ्यांनी ठोठावला मोठा दंड

Last Updated : May 3, 2023, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.