ETV Bharat / sports

IPL 2023 : आज ठरणार IPL चा विजेता, धोनीच्या सीएसकेसमोर हार्दिकच्या गुजरातचे आव्हान ; जाणून घ्या सर्वकाही - Indian Premier League

आयपीएल 2023 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला होता. आता हेच दोन संघ फायनलमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

Chennai super kings vs Gujrat titans
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स
author img

By

Published : May 28, 2023, 3:46 PM IST

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 ची फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाणार आहे. फायनलमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना 4 वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी आहे. या मोसमात दोन्ही संघ सर्वात सातत्यपूर्ण आहेत. लीग टप्प्यात गुणतालिकेत त्यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवले होते. हे दोन्ही संघ क्वालिफायर 1 मध्ये आमनेसामने आले होते. त्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईने हार्दिक पांड्याच्या गुजरातवर मात केली होती. आता ते विजेतेपदाच्या सामन्यात पुन्हा आमनेसामने आहेत.

गुजरातच्या खेळाडूंकडे ऑरेंज आणि पर्पल कॅप : शुभमन गिलने या मोसमात धमाकेदार फलंदाजी केली आहे. त्याने 15 सामन्यांमध्ये 851 धावा केल्या आहेत. यात 3 शतके आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावे आहे. त्याने 2016 मध्ये 4 शतकांच्या मदतीने 973 धावा केल्या होत्या. गोलंदाजीत गुजरातच्या मोहम्मद शमी, राशिद खान आणि मोहित शर्मा या त्रिकुटाने अनुक्रमे 28, 27 आणि 24 विकेट्स घेत अव्वल तीन स्थानांवर कब्जा केला आहे.

दोन्ही कर्णधारांना विक्रमाची संधी : सीएसकेसाठी, वेळप्रसंगी विविध खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करून सामने जिंकून दिले आहेत. अंतिम फेरीत गुजरातचा पराभव करताच धोनी कर्णधार म्हणून सर्वाधिक आयपीएल खिताब जिंकण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी करेल. रोहितने कर्णधार म्हणून आत्तापर्यंत 5 आयपीएल खिताब जिंकले आहेत. दुसरीकडे, जर गुजरातने चेन्नईचा पराभव केला तर हार्दिक पांड्या एकूण आयपीएल खिताब जिंकण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी करेल. रोहितकडे सध्या एकूण 6 आयपीएल खिताब आहेत.

अंतिम सामन्याची वेळ : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स अंतिम सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7:00 वाजता होईल. गुजरात टायटन्सचे घर असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. क्वालिफायर 2 देखील त्याच ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. टायटन्सने या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम फेरीत सुपर किंग्ससोबत डेट बुक केली होती.

विजेत्या संघाला मिळेल एवढी रक्कम : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स आयपीएलमध्ये एकूण 4 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये धोनीच्या सुपर किंग्जनी फक्त एकदाच विजय मिळवला आहे. फायनल सुरू होण्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर समारोप समारंभही आयोजित करण्यात येणार आहे. समारोप समारंभ संध्याकाळी 6:00 वाजता सुरू होईल. आयपीएल 2023 च्या फायनलमधील विजेत्या संघाला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल, तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये मिळतील.

हेही वाचा :

  1. नवसाला पावणारा सिद्धिविनायक गणपती अंबानींवर नाराज, चरणी नतमस्तक होऊनही मुंबई इंडियन्सचा पराभव
  2. IPL 2023 : मुंबईवर ६२ धावांनी विजय मिळवत गुजरात टायटन्स अंतिम फेरीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.