चेन्नई : आयपीएल 2023 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना मुंबई इंडियन्सशी आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 139 धावा केल्या. मुंबईकडून नेहाल वढेराने 51 चेंडूत सर्वाधिक 64 धावा केल्या. तर चेन्नईकडून मथीशा पाथीरानाने तीन बळी घेतले.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग 11) : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश तीक्षा ; इम्पॅक्ट प्लेअर्स - अंबाती रायुडू, मिचेल सँटनर, सुभ्रांशु सेनापती, शेख रशीद, आकाश सिंग
मुंबई इंडियन्स (प्लेइंग 11) : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, नेहाल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, आकाश मधवाल, अर्शद खान ; इम्पॅक्ट प्लेअर्स - कुमार कार्तिकेय, रमणदीप सिंग, देवाल्ड ब्रेविस, राघव गोयल, विष्णू विनोद
महेद्रसिंह धोनी : आम्ही प्रथम गोलंदाजी करू. थोडा पाऊस अपेक्षित आहे, हे या मागचे एक कारण आहे. ही विकेट चांगली दिसते आहे. त्यांनी आमच्यासाठी टारगेट सेट करावे अशी आमची इच्छा आहे. प्रत्येक खेळाडूने चांगला खेळ केला आहे. आम्ही प्रत्येक गेममध्ये सुधारणा केली आहे. काही मॅचेसमध्ये मागे - पुढे झाले आहे, परंतु अंतत: आम्हाला चांगले फिनिश करणे आवश्यक आहे. आम्ही त्याच टीमसह खेळत आहोत.
रोहित शर्मा : खूप चांगले चालले आहे. आम्ही काही चांगल्या मॅचेस खेळल्या आहोत. आमच्यातही काही त्रुटी आहेत, परंतु आम्ही त्या दूर करण्यास सुरुवात केली आहे. योग्य खेळाडू आणि योग्य कॉम्बिनेशन शोधणे आव्हानात्मक आहे. आम्हाला आमची ताकद आणि त्यात फिट होणारे खेळाडू माहित आहेत. आमच्या तीममध्ये दोन बदल आहेत. कुमार कार्तिकेय बाहेर गेला आहे. राघव गोयलचे पदार्पण झाले आहे. तिलक वर्मा आजारी आहे. त्याच्या जागी ट्रिस्टन स्टब्स संघात आला आहे.