चेन्नई : IPL 2023 मध्ये चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 55 वा सामना खेळण्यात आला. या सामन्यात घरच्या मैदानवरCSK ने दिल्ली कॅपिटल्सचा २७ धावांनी पराभव केला. चेन्नईचा हा हंगामातील 7वा विजय आहे.
प्रथम फलंदाजी करताना CSK ने 20 षटकात 8 विकेट गमावत 167 धावा करून दिल्ली कॅपिटल्सला आव्हान दिले. शिवम दुबेने 25, रुतुराज गायकवाडने 24, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजाने 21, अंबाती रायडूने 23 धावा केल्या. CSK कर्णधार धोनीने अवघ्या 9 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार मारत 20 धावा केल्या. त्याचवेळी 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाची पुरती दमछाक झाली. दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकांत 8 बाद 140 धावाच करता आल्या. दिल्लीविरुद्ध मतिशा पाथिरानाने 3, दीपक चहरने 2, रवींद्र जडेजाने 1 गडी बाद केले. रवींद्र जडेजाला सामनावीराचा किताब देण्यात आला आहे. या लीगमध्ये, CSK 12 सामन्यांमध्ये 7 सामने जिंकून 15 गुणांसह गुणतालिकेत 2 व्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा संघ गुणतालिकेत 8 गुणांसह 10व्या क्रमांकावर आहे. या विजयानंतर धोनीच्या संघाचा प्लेऑफचा मार्ग सोपा होणार आहे
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग 11) : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर आणि कर्णधार), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तीक्षा ; इम्पॅक्ट प्लेअर्स - मथीशा पाथिराना, सुभ्रांशु सेनापती, मिच सॅन्टनर, आकाश सिंग, शेख रशीद
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग 11) : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा ; इम्पॅक्ट प्लेअर्स - मुकेश कुमार, मनीष पांडे, प्रवीण दुबे, अभिषेक पोरेल, चेतन सकारिया
महेंद्रसिंह धोनी : आम्ही प्रथम फलंदाजी करू. या विकेटवर आम्ही काही सामने खेळलो आहोत. ही विकेट स्लो होण्याची शक्यता आहे. आम्ही या ट्रॅकबद्दल तक्रार करू शकत नाही. आम्ही गोष्टी सोप्या ठेवण्याच्या प्रयत्न करतो. आम्ही आमचे प्लॅन अमलात आणण्याचा प्रयत्न करतो. आमच्या संघात एक बदल आहे. अंबाती रायुडूच्या जागी शिवम दुबे आला आहे.
डेव्हिड वॉर्नर : खेळपट्टी थोडे कोरडी आहे. आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत. आम्हाला आमच्या पॉवरप्ले मधील फलंदाजीवर काम करावे लागणार आहे. या विकेटवर जितके शक्य असेल तितके प्रयत्न आम्ही करू. आमच्या संघात एक बदल आहे. मनीष पांडेच्या जागी ललित यादव येतो आहे.
हेही वाचा :