नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16 व्या हंगामाचा नुकताच समारोप झाला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज या संघाने अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करुन विजेतेपदावर मोहर उमटवली. या मोसमात अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले. त्यामुळे कोणत्या खेळाडूला यावेळी पुरस्कार सोहळ्यात कोणता पुरस्कार आणि किती रक्कम मिळाली याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. या आयपीएलच्या हंगामात शुभमन गिलचे नाव या यादीत सर्वाधिक वेळा आले असून त्याने सर्वाधिक 4 पुरस्कार जिंकले आहेत.
- विजेता आणि उपविजेता : चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2023 विजेता संघ बनला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज या संघाला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. दुसरीकडे गुजरात टायटन्सचा संघ उपविजेता ठरला आहे. गुजरात संघाला 12.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.
ऑरेंज कॅप : गुजरात टायटन्सचा स्टार सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने IPL 2023 मध्ये सर्वाधिक धावा केल्या. शुभमन ऑरेंज कॅपधारक फलंदाज बनला आहे. यासाठी गिलला 10 लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात आले. शुभमन गिलने या मोसमात 17 सामन्यात 59.33 च्या सरासरीने आणि 15.80 च्या स्ट्राईक रेटने एकूण 890 धावा केल्या. यादरम्यान गिलने 3 शतके आणि 4 अर्धशतकेही झळकावली.
- पर्पल कॅप : गुजरात टायटन्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल 2023 चा पर्पल कॅप धारक गोलंदाज बनला. यासाठी शमीला 10 लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात आले. शमीने आयपीएलच्या 16 व्या मोसमात 17 सामने खेळताना सर्वाधिक 28 विकेट घेतल्या.
उदयोन्मुख खेळाडू : राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला IPL 2023 साठी इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कार मिळाला. यासाठी यशस्वी जयस्वालला 10 लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात आले. जैस्वालने या मोसमात 14 सामन्यात 1 शतक आणि 5 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 625 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची धावांची सरासरी 48.08 आणि स्ट्राइक रेट 163.61 होता.
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन : गुजरात टायटन्सचा स्टार फलंदाज शुभमन गिलने आयपीएल 2023 साठी मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कार जिंकला. यासाठी शुभमन गिलला 10 लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात आले. गिलने या मोसमात सर्वाधिक 890 धावा केल्या आहेत. एका मोसमात कोणत्याही खेळाडूने केलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या धावा आहेत.
इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द सीझन : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा बॅट्समन ग्लेन मॅक्सवेलला IPL 2023 साठी इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द सीझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासाठी त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात आले. मॅक्सवेलने या मोसमात 14 सामन्यात 183.49 च्या स्ट्राईक रेटने 400 धावा केल्या आहेत.
गेम चेंजर ऑफ द सीझन : गुजरात टायटन्सचा स्टार फलंदाज शुभमन गिलला आयपीएल गेम चेंजर ऑफ द सीझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासाठी गिलला 10 लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात आले. सुमारे अर्धा डझन सामन्यांमध्ये गिलने आपल्या फलंदाजीने सामना आपल्या संघाकडे वळवण्याचे काम केले. शुभमन गिलने सर्वाधिक गुण आपल्या नावावर केले आहेत.
- सर्वात लांब षटकार : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने IPL 2023 मध्ये सर्वात लांब षटकार मारण्याचा पुरस्कार जिंकला. यासाठी त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. डुप्लेसिसने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात लेग-स्पिनर रवी बिश्नोईच्या चेंडूवर 115 मीटरचा षटकार मारला.
- सर्वाधिक चौकार : गुजरात टायटन्सचा फलंदाज शुभमन गिलने IPL 2023 मध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा पुरस्कार जिंकला. यासाठी त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात आले. गिलने या मोसमात 17 सामन्यांमध्ये सर्वाधिक 85 चौकार मारले.
- कॅच ऑफ द सीझन : गुजरात टायटन्सचा अष्टपैलू खेळाडू रशीद खानने कॅच ऑफ द सीझनचा पुरस्कार जिंकला. यासाठी त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात आले. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात रशीदने काइल मेयर्सचा शानदार झेल पकडला, जो मोसमातील सर्वोत्तम झेल ठरला.
- फेअर प्ले अवॉर्ड : दिल्ली कॅपिटल्ससाठी हा मोसम खराब गेला आहे. दिल्ली या हंगामात गुणतालिकेत 9 व्या क्रमांकावर आहे. परंतु खेळाच्या भावनेसाठी त्यांना IPL 2023 साठी फेअर प्ले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासाठी त्याला ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
- सर्वोत्कृष्ट खेळपट्टी आणि ग्राउंड ऑफ द सीझन : IPL 2023 साठी सर्वोत्कृष्ट खेळपट्टी आणि मैदानाचा पुरस्कार अनुक्रमे ईडन गार्डन्स आणि वानखेडे स्टेडियमला देण्यात आला. यासाठी दोन्ही मैदानाला एकत्रितपणे 50 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
हेही वाचा -