ETV Bharat / sports

IPL 2022 SRH vs RR: आज हैदराबादचे नवाब आणि राजस्थानचे राजे आमनेसामने - संजू सॅमसन

इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमातील पाचवा सामना मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) यांच्यात होणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजता उभय संघांमधील सामना सुरू होईल.

SRH vs RR
SRH vs RR
author img

By

Published : Mar 29, 2022, 6:07 PM IST

पुणे: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पाचवा सामना पुण्यातील एमसीए ( Maharashtra Cricket Association ) मैदानावर खेळला जाणार आहे. या हंगामातील पुण्याच्या मैदानावर खेळला जाणार हा पहिला सामना आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरुवात संध्याकाळी साडेसात वाजत होणार आहे. राजस्थान आणि हैदराबादचे संघ अनुक्रमे संजू सॅमसन आणि केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली उतरतील.

रॉयल्सने 2008 मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले. मात्र त्यानंतर संघाला कधीच प्रभावी कामगिरी करता आली नाही. सॅमसनने ( Captain Sanju Samson ) दरवर्षी एक-दोन सामन्यांत चांगला खेळ केला आहे, पण रॉयल्सला दुसरे विजेतेपद मिळवायचे असेल, तर त्याला त्याच्या कामगिरीत सातत्य ठेवावे लागेल. यामुळे सॅमसनला या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित करण्याची संधी मिळेल. जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल रॉयल्सच्या डावाची सुरुवात करू शकतात. बटलर कोणत्याही आक्रमणाला झुगारून देण्यास सक्षम आहे. पडिक्कलसह तो रॉयल्सला दमदार सुरुवात करून देऊ शकतो, ज्यामुळे सॅमसनसारख्या खेळाडूसाठी ते सोपे होईल.

मधल्या फळीत, रॉयल्सकडे पॉवर हिटर शिमरॉन हेटमायर ( Power heater Shimron Heitmeyer ), रसी व्हॅन डेर डुसेन, जिमी नीशम आणि रियान पराग सारखे खेळाडू आहेत. त्यांचे योगदान संघासाठी खूप महत्त्वाचे असेल. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांच्या उपस्थितीत रॉयल्सकडे मजबूत गोलंदाजी युनिट आहे. हे दोघेही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळतील याची खात्री असून त्यांची आठ षटके खूप महत्त्वाची असतील. वेगवान गोलंदाजी विभागाचे नेतृत्व ट्रेंट बोल्टकडे असेल, त्याच्यासोबत प्रसिद्ध कृष्णा आणि नवदीप सैनी आहेत.

सनरायझर्सबद्दल बोलायचे तर कर्णधार केन विल्यमसन ( Captain Ken Williamson ) सर्वात अनुभवी फलंदाज आहे. त्याचा न्यूझीलंडचा सहकारी ग्लेन फिलिप्स डावाची सुरुवात करू शकतो. मधल्या फळीची जबाबदारी निकोलस पूरन, प्रियम गर्ग आणि राहुल त्रिपाठी यांच्यावर असेल. विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर उतरला तर रविकुमार समर्थ सलामीवीराची भूमिका बजावू शकतो. तर अब्दुल समदची भूमिका फिनिशरची असेल.

भुवनेश्वर कुमार सनरायझर्सच्या गोलंदाजीचे नेतृत्व करेल. पण त्याला आणि उमरान मलिकला कामगिरीत सातत्य ठेवावे लागेल. डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजन पुनरागमन करत असून त्याचा यॉर्कर विरोधी फलंदाजांसाठी घातक ठरू शकतो. फिरकीपटूंमध्ये वॉशिंग्टन सुंदर ( Spinner Washington Sundar ), श्रेयस गोपाल आणि जे सुचित यांची भूमिका देखील महत्त्वाची असेल.

या दोन्ही संघात आतापर्यंत पंधरा सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी आठ सामन्यात हैदराबाद संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर राजस्थान संघाने सात सामन्यात विजय मिळवला आहे. मागील सहा सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर या दोन संघात काट्याची टक्कर पाहायला मिळाली आहे. ज्यामध्ये दोन्ही संघाने प्रत्येकी 3-3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज होणार सामना नक्कीच रंगतदार होईल.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रियान पराग, शुभम गरवाल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, कुलदीप सेन, तेजस बरोका, अनुनय सिंग, केसी करिअप्पा, जोस बटलर, रसी व्हॅन डर ड्युसेन, नॅथन कुल्टर-नाईल, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, करुण नायर, ओबेद मॅककॉय, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रशांत कृष्णा आणि युझवेंद्र चहल.

सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, आर समर्थ, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रोमॅरियो शेफर्ड, मार्को जॅन्सन, जे सुचित , श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, शॉन अॅबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फजलहक फारुकी, उमरान मलिक आणि टी नटराजन.

हेही वाचा - Gt Vs Lsg: गुजरात टायटन्सची आयपीएल स्पर्धेत विजयी सलामी; लखनौ सुपरजायंट्सचा पाच विकेट्सने पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.