अहमदाबाद : टाटा आयपीएल 2023 चा 13 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळला. यात केकेआरचा शानदार विजय झाला आहे. गुजरातने सुरुवातीला फलंदाजी करत केकेआरसमोर 205 धावांचे ट्रार्गेट दिले होते. केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र, अखेरच्या दोन ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करत केकेआरने हा विजय मि्ळवला आहे.
रिंकू सिंहचे सलग पाच षटकार : अखेरच्या षटकात लागोपाठ पाच षटकार लगावत रिंकू सिंह याने कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला. वेंकटेश अय्यर याने चांगली खेळी करत अर्धशतक झळकावला. त्यानंतर अखेरच्या षटकात रिंकू सिंहने सलग पाच षटकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला. कोलकात्याचा हा सलग दुसरा विजय आहे.
रशीद खानची हॅटट्रिक - केकेआरच्या डावाच्या १७व्या षटकात गुजरात टायटन्सचा गोलंदाज रशीद खानने सामना उलटवला. आयपीएल 2023 च्या मोसमात रशीद पहिली हॅटट्रिकसह चमकला. त्याने आंद्रे रसेलला एका धावेवर आणि सुनील नारायण-शार्दुल ठाकूरला शून्यावर बाद केले. यासह, 18 व्या षटकानंतर 7 विकेट गमावून केकेआरची धावसंख्या 195 होती. मात्र, रिंकू सिंहच्या शानदार खेळीने केकेआरला विजय मिळवता आला.
गुजरात टायटन्स अशी होती प्लेइंग -11 : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान (कर्णधार) अल्झारी जोसेफ, जोश लिटल, यश दयाल, मोहम्मद शमीस सबस्टिट्युट खेळाडू: जोश लिटल, जयंत यवत, जयकर भरत, मोहित शर्मा, मॅथ्यू वेड.
कोलकाता नाईट रायडर्स अशी होती प्लेइंग -11 : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), नितीश राणा (कर्णधार), एन जगदीसन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती बदली खेळाडू: मनदीप सिंग, अनुकुलन रॉय, वैभव अरोरा, व्यंकटेश अय्यर, डेव्हिड विसे.