ETV Bharat / sports

Virat Kohli Cryptic Post : गौतम गंभीरसोबत झालेल्या वादानंतर कोहलीने शेअर केली पोस्ट - Virat Kohli post

गौतम गंभीरसोबत झालेल्या भांडणानंतर विराट कोहलीने एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे कोहलीने अनेकांना एक पोस्ट शेअर करून टोमणे मारले आहेत. आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यात वाद झाला होता.

Virat Kohli Cryptic Post
कोहलीने शेअर केली पोस्ट
author img

By

Published : May 2, 2023, 3:14 PM IST

नवी दिल्ली : आयपीएल 2023 च्या 43व्या सामन्यानंतर विराट कोहली पुन्हा चर्चेत आला आहे. लखनौच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सवर 18 धावांनी विजय नोंदवला. सामना जिंकल्यामुळे किंग कोहली चर्चेत आलेला नाही. याचे कारण काही वेगळेच आहे. सामना संपल्यानंतर कोहली आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्यात मैदानावर जोरदार बाचाबाची झाली. यानंतर कोहली संतापला आणि त्यानंतर गदारोळ झाला. आता या वादानंतर कोहलीने एक पोस्ट शेअर करून अनेकांवर निशाणा साधला आहे.

विराटने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट शेअर केली : सोमवार, 1 मे रोजी इकाना मैदानावर झालेल्या सामन्यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात जोरदार वाद झाला, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. या वादानंतर विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कोहलीने 161 ते 180 AD पर्यंत राज्य करणाऱ्या माजी रोमन सम्राट मार्कस ऑरेलियसचा उल्लेख केला आहे. ते तत्त्वज्ञही होते. माजी कर्णधार कोहलीने या कथेतून एक संदेश दिला आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, 'आपण जे काही ऐकतो ते एक मत आहे, तथ्य नाही, आपण जे काही पाहतो ते एका संदर्भात घडते, ते खरे असेलच असे नाही'.

विराट कोहली का संतापला : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडणाचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कोहली गंभीरसोबत वाद घालताना दिसत आहे. त्याचवेळी लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटर गौतम गंभीर कोहलीच्या बोलण्यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. या दोन्ही खेळाडूंमधील वाद इतका वाढला होता की, लखनौ आणि आरसीबीच्या संघसहकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. तत्पूर्वी, खेळानंतर हस्तांदोलनाच्या वेळी कोहलीचा लखनौ फ्रँचायझी वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकशी वाद झाला होता.

हेही वाचा : IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौवर १८ धावांनी विजय मिळवला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.