ETV Bharat / sports

IPL 2023 : पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 31 धावांनी केला पराभव, हरप्रीत ब्रारने 4 घेतल्या विकेट - दिल्ली कॅपिटल्सचा 31 धावांनी पराभव

दिल्ली आणि पंजाबमध्ये झालेल्या सामन्यात. पंजाबने पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 167 धावा केल्या. व दिल्लीसमोर 168 धावांचे टार्गेट ठेवले होते. यात पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 31 धावांनी पराभव केला. तर हरप्रीत ब्रारने 4 घेतल्या विकेट

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : May 13, 2023, 9:18 PM IST

Updated : May 13, 2023, 11:41 PM IST

नवी दिल्ली: टाटा आयपीएल 2023 चा 59 वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या मोसमात दिल्ली कॅपिटल्स 12 पैकी केवळ 4 सामने जिंकले आहेत आणि 8 गुणांसह ते गुणतालिकेत सर्वात खालच्या 10 व्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्ज 10 गुणांसह गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर होते. आजच्या सामन्यानंतर पंजाब किंग्जने 12 पैकी 6 सामने जिंकले आहेत.

16व्या षटकात अमान खानच्या रूपाने दिल्ली कॅपिटल्सची 7वी विकेट गेली. अमन 18 चेंडूत 16 धावा करून बाद झाला.दिल्लीच्या डावातील 15 षटके पूर्ण झाली. दिल्लीने 6 विकेट गमावल्या आहेत. अमन खान आणि प्रवीण दुबे फलंदाजी करत आहेत. दिल्लीचा स्कोअर 8 ओव्हरनंतर 80/2 होता. 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स क्रीजवर आली. दरम्यान, फिल सॉल्ट आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ६९ धावांची भागीदारी केली. पण फिल सॉल्ट 21 धावा करून झेलबाद झाला. त्याच्या जागी मिचेल मार्शल जास्त वेळ क्रीझवर राहू शकला नाही आणि 4 चेंडूत फक्त 3 धावा करून बाद झाला.पंजाब किंग्जने सॅम करनची विकेट गमावली, पंजाबने 16 षटकांत 129/5 धावा केल्या.

पंजाबच्या डावातील 10 षटके पूर्ण झाली तेव्हा सॅम करण आणि प्रभासिमरन फलंदाजी करत होते त्यावेळी. प्रभासिमरनने 27 धावा केल्या. यासह सॅम करणने 12 धावांचे योगदान दिले.जितेश शर्मा 5 धावांवर बाद झाला. आणि पंजाब किंग्जची तिसरी विकेट पडली, इशांत शर्माने पंजाबला दुसरा धक्का दिला. लिव्हिंगस्टनला क्लीन बोल्ड केले. लिव्हिंगस्टनने 4 धावा केल्या. जितेश शर्मा फलंदाजीला आला.

पंजाबचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते. तिथे प्रभसिमरन सिंगने शतक झळकावत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. शिखर धवन हा दुसऱ्याच षटकात बाद झाला होता. धवनला सात धावा करता आल्या होत्या. प्रभसिमरन सिंग हा पंजाबच्या संघाकडून एकटा लढत होता. शतकवीर प्रभसिमरन सिंग १९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. सलामीवीराने ६५ चेंडूत १०३ धावा केल्या. या खेळीत त्याने १० चौकार आणि ६ षटकार मारले. मुकेश कुमारने त्याला बोल्ड केले. शाहरुख खान २ धावांवर धावबाद झाला. सिकंदर रझा ७ चेंडूत ११ धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग 11 : डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, रिले रुसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार

पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन : प्रभसिमरन सिंह, शिखर धवन (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, सिकंदर रजा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषि धवन, राहुल चाहर, अर्शदीप सिंह

हेही वाचा -

IPL 2023 : लखनऊचा हैदराबादवर 7 गडी राखून विजय, मांकडच्या नाबाद 64 धावा

Last Updated : May 13, 2023, 11:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.