मुंबई - आयपीएल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक समोर आले आहे. येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल २०२१चे सामने सुरू होणार आहेत. तर, लीगचा अंतिम सामना जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. ३० मे रोजी हा सामना पार पडेल.
या लीगचा पहिला सामना पाच वेळा गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या बलाढ्य संघात रंगणार आहे. यंदाच्या हंगामात ११ दिवशी दोन सामने खेळवण्यात येणार आहेत. क्वालिफायर-१, एलिमिनेटर आणि क्वालिफायर-२चे सामनेही मोदी स्टेडियमवर होतील.
-
🚨 BCCI announces schedule for VIVO IPL 2021 🚨
— IndianPremierLeague (@IPL) March 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The season will kickstart on 9th April in Chennai and the final will take place on May 30th at the Narendra Modi Stadium, Ahmedabad.
More details here - https://t.co/yKxJujGGcD #VIVOIPL pic.twitter.com/qfaKS6prAJ
">🚨 BCCI announces schedule for VIVO IPL 2021 🚨
— IndianPremierLeague (@IPL) March 7, 2021
The season will kickstart on 9th April in Chennai and the final will take place on May 30th at the Narendra Modi Stadium, Ahmedabad.
More details here - https://t.co/yKxJujGGcD #VIVOIPL pic.twitter.com/qfaKS6prAJ🚨 BCCI announces schedule for VIVO IPL 2021 🚨
— IndianPremierLeague (@IPL) March 7, 2021
The season will kickstart on 9th April in Chennai and the final will take place on May 30th at the Narendra Modi Stadium, Ahmedabad.
More details here - https://t.co/yKxJujGGcD #VIVOIPL pic.twitter.com/qfaKS6prAJ
लीगमधील एकूण ५६ सामन्यांपैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू हे प्रत्येकी १० सामन्यांचे आयोजन करतील. तर, अहमदाबाद आणि दिल्लीच्या मैदानावर प्रत्येकी ८ सामने खेळवले जाणार आहेत. कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार नाही. दुपारच्या वेळेतील सामने ३:३० तर, सायंकाळी होणारे सामने ७:३० वाजता सुरू होतील.
कोरोना आणि या आजाराच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लीग स्टेजपर्यंत सर्व संघ प्रत्येकी तीन वेळा सामन्यांसाठी प्रवास करतील. लीगची सुरुवात प्रेक्षकांशिवाय होईल. परंतू प्रेक्षकांच्या समावेशाचा निर्णय नंतर घेण्यात येईल.