हैदराबाद : आयपीएल 2022 चा मेगा लिलाव (Mega auction of IPL 2022) बंगळुरु येते पार पडला आहे. या लिलावाच्या पहिल्या दिवशी दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू आवेश खानने एक इतिहास रचला आहे. तो आयपीएल लिलावात सर्वाधिक मानधन घेणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे.
वेगवान गोलंदाज आवेश खानला (Fast bowler Awesh Khan) लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) 10 कोटींना विकत घेतले आहे. आवेशची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. अशा प्रकारे त्याला 50 पट अधिक भाव मिळाला. आवेशच्या आधी कृष्णप्पा गौतम हा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू होता. गेल्या वर्षी झालेल्या लिलावात गौतमला चेन्नई सुपर किंग्जने 9.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यानंतर तो क्रुणाल पांड्याला मागे टाकत सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. गौतमला चेन्नईने नक्कीच विकत घेतले, परंतु त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
आवेश खानची आयपीएल कारकीर्द -
आवेश खानची आयपीएल कारकीर्द (Awesh Khan IPL career) पाहिले, तर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आवेशने 25 सामन्यात 29 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 8.23 आहे. दिल्लीसाठी चमकदार कामगिरी केल्यानंतर आवेश प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यानंतर तो टीम इंडियामध्ये सामील झाला. मात्र, त्याला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.
पहिल्या दिवशी 44 अनकॅप्ड खेळाडूंवर बोली (Bid 44 uncapped players first day) लावण्यात आली. यातील आठ खेळाडूंना खरेदीदार मिळाले नाहीत. अवेश खान 10 कोटींसह सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. शाहरुख खानला पंजाब किंग्जने नऊ कोटी रुपयांत आपल्या संघासह कायम ठेवले होते. शाहरुखही गेल्या वर्षी पंजाबकडून खेळला होता. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादने राहुल त्रिपाठीला 8.50 कोटींना खरेदी केले.