नवी दिल्ली IPL 2024 Auction : एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर आता आयपीएल २०२४ ची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी १९ डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव होईल. या लिलावासाठी तब्बल ११६६ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. क्रिकेट जगतातील अनेक टॉप खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.
आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच भारताबाहेर : यंदा आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच भारताबाहेर होणार आहे. आयपीएल २०२४ चा लिलाव दुबईत होईल. या लिलावापूर्वी, आज आम्ही तुम्हाला अशा काही खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यावर लिलावात सर्वाधिक बोली लागू शकते. या खेळाडूंनी भारतीय खेळपट्ट्यांवर बॉल आणि बॅटनं चमकदार कामगिरी केली आहे.
-
𝗜𝗣𝗟 𝟮𝟬𝟮𝟰 𝗔𝘂𝗰𝘁𝗶𝗼𝗻 🔨
— IndianPremierLeague (@IPL) December 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🗓️ 19th December
📍 𝗗𝗨𝗕𝗔𝗜 🤩
ARE. YOU. READY ❓ #IPLAuction | #IPL pic.twitter.com/TmmqDNObKR
">𝗜𝗣𝗟 𝟮𝟬𝟮𝟰 𝗔𝘂𝗰𝘁𝗶𝗼𝗻 🔨
— IndianPremierLeague (@IPL) December 3, 2023
🗓️ 19th December
📍 𝗗𝗨𝗕𝗔𝗜 🤩
ARE. YOU. READY ❓ #IPLAuction | #IPL pic.twitter.com/TmmqDNObKR𝗜𝗣𝗟 𝟮𝟬𝟮𝟰 𝗔𝘂𝗰𝘁𝗶𝗼𝗻 🔨
— IndianPremierLeague (@IPL) December 3, 2023
🗓️ 19th December
📍 𝗗𝗨𝗕𝗔𝗜 🤩
ARE. YOU. READY ❓ #IPLAuction | #IPL pic.twitter.com/TmmqDNObKR
- ट्रॅव्हिस हेड - ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड या यादीत अव्वल स्थानी आहे. त्यानं नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. ट्रॅव्हिस हेड त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यानं भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांविरुद्ध भरपूर धावा केल्या आहेत. त्याच्या नावे २३ टी-२० सामन्यांच्या २२ डावांमध्ये १ अर्धशतकासह ५५४ धावा आहेत. या लिलावात चेन्नई, बंगळुरू आणि गुजरात सारखे संघ त्याच्यावर मोठी बोली लावू शकतात.
- रचिन रवींद्र - न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रनं २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजीविरुद्ध शानदार फलंदाजी केली. तो डावाची सुरुवात करतो. शिवाय तो तिसऱ्या क्रमांकावरही फलंदाजी करू शकतो. त्याची फिरकी गोलंदाजी भारतीय खेळपट्ट्यांवर प्रभावी ठरू शकते. त्यानं न्यूझीलंडसाठी १८ सामन्यांच्या १६ डावात १४५ धावा केल्या आहेत. सोबतीला त्याच्या नावे ११ बळीही आहेत. लिलावात हैदराबाद, मुंबई आणि पंजाबसारख्या फ्रँचायझी त्याच्यावर बोली लावू शकतात.
- जेराल्ड कोएत्झी - दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम गोलंदाजापैकी एक असलेल्या जेराल्ड कोएत्झीसाठी मोठी बोली लागू शकते. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत त्यानं भारतीय खेळपट्ट्यांवर चेंडूनं अप्रतिम कामगिरी केली. या लिलावात त्यानं २ कोटी रुपयांची बेस प्राइज ठेवली आहे. आरसीबीचा संघ त्याच्यावर मोठी बोली लावू शकतो, कारण आरसीबीला वेगवान गोलंदाजाची गरज आहे. कोएत्झीनं आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी ३ टी-२० सामन्यात ३ बळी घेतले आहेत.
- शार्दुल ठाकूर - टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरवर अनेक संघ मोठी बोली लावू शकतात. चेंडूशिवाय तो बॅटनेही उपयुक्त ठरू शकतो. त्यानं याआधी आयपीएलमध्ये काही शानदार खेळी खेळल्या आहेत. केकेआरनं त्याला यावर्षी रिलीज केलं. शार्दुलला आयपीएलचा मोठा अनुभव आहे. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआरकडून खेळला आहे. शार्दुलनं आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ८६ सामने खेळले. यामध्ये त्यानं ८९ बळी घेतले आहेत.
- मिचेल स्टार्क - ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला या लिलावात मोठी रक्कम मिळू शकते. केकेआर, आरसीबी, पंजाब आणि दिल्ली त्याच्यासाठी मोठी बोली लावू शकतात. याआधी तो आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळला आहे. स्टार्कनं २७ आयपीएल सामन्यांच्या २६ डावात ३४ विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा :