ETV Bharat / sports

IPL 2022 LSG v RCB : नाणेफेक जिंकून लखनौचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल नाही - IPL News

नवी मुंबईतील डीवीय पाटील स्टेडियमवर मंगळवारी (19 एप्रिल) लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( LSG vs RCB ) संघात सामना खेळला जाणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार केएल राहुल आणि फाफ डु प्लेसिस यांच्यात नाणेफेक पार पडली आहे. केएल राहुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

LSG v RCB
LSG v RCB
author img

By

Published : Apr 19, 2022, 7:15 PM IST

नवी मुंबई: आयपीएल 2022 च्या मोसमातील 31 वा सामना नवी मुंबईतील डीवीय पाटील स्टेडियमवर मंगळवारी (19 एप्रिल) संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. हा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( LSG vs RCB ) संघात होणार आहे. हे दोन्ही संघ प्रथम एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार केएल राहुल ( KL Rahul ) आणि फाफ डु प्लेसिस ( Faf du Plessis ) यांच्यात नाणेफेक पार पडली आहे. केएल राहुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Lucknow Super Giants opt to bowl ) आहे.

लखनौ सुपरजायंट्स संघाने ( Lucknow Super Giants ) आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी चार सामने जिंकले आहेत. या संघाला दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, ज्यामुळे हा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore ) संघाने देखील सहा सामने खेळलेत, ज्यापैकी चार सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यामुळे या संघाचे आठ गुण आहेच आणि हा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघानी आजच्या सामन्यासाठी आपापल्या संघात एक ही बदल केलेला नाही. दोन्ही संंघांनी मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हन कायम ठेवली आहे.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, आवेश खान आणि रवी बिश्नोई.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड आणि मोहम्मद सिराज.

हेही वाचा - Former Cricketer Ryan Campbell : नेदरलँडच्या क्रिकेट प्रशिक्षकाला हृदयविकाराचा झटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.