ETV Bharat / sports

IPL 2022 SRH vs GT : सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स आज आमनेसामने

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या 21 व्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. गुजरातने आतापर्यंत तीन सामने खेळले असून सर्व जिंकले आहेत. आतापर्यंत या स्पर्धेतील हा एकमेव संघ आहे, ज्याने एकही सामना गमावलेला नाही. सनरायझर्स हैदराबादने तीन सामने खेळले असून, एकात विजय मिळवला आणि दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला.

author img

By

Published : Apr 11, 2022, 4:57 PM IST

SRH vs GT
SRH vs GT

मुंबई: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स ( Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans ) संघात आज आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एकविसावा सामना खेळला जाणार आहे. हा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याला संध्याकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल. दोन्ही संघानी आपापला मागील सामना जिकंला आहे. त्यामुळे हा सामना देखील जिंकण्याचा दोन्ही संघाचा इरादा असणार आहे.

आयपीएलच्या 15 व्या हंगामात गुजरातच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याच्या ( Captain Hardik Pandya ) संघाने आतापर्यंत सलग तीन सामने जिंकले आहेत. तर हैदराबादची सुरुवात खराब राहिली आणि सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु त्यांनी सीएसकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात सनरायझर्सने पहिला विजय नोंदवला आहे. आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत या दोन संघानी प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. गुजरात टायटन्स संघाने तीन ही सामने जिंकले असून ते सहा गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. त्याचबरोबर हैदराबाद संघाने आपल्या तीनपैकी एक सामन्यात विजय मिळवला असून दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे हा संघ दोन गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे.

आजचा सामना सनरायझर्स हैदराबादसाठी ( Sunrisers Hyderabad ) महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून संघाला आणखी दोन गुण मिळवायचे प्रयत्न असणार आहे. आयपीएलच्या या मोसमात हैदराबाद संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. पहिल्या सामन्यात सनरायझर्सचा राजस्थान रॉयल्सकडून 61 धावांनी पराभव झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने त्यांचा 12 धावांनी पराभव केला.

त्याच वेळी, गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans ) आयपीएल 2022 मध्ये विजयाची हॅटट्रिकसह शानदार सुरुवात केली आहे. टायटन्सने पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 5 विकेट्सने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 14 धावांनी पराभव केला. यानंतर तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला.

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: शुबमन गिल, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, दर्शन नळकांडे आणि मोहम्मद शमी.

सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, उमरान मलिक आणि टी नटराजन.

हेही वाचा - IPL 2022 LSG vs RR : खराब सुरुवातीनंतर ही आम्हाला विजयाची आशा होती - केएल राहुल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.