ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : खराब फॉर्मशी झुंज देणार्‍या ऋषभ पंतला शोएब अख्तरने दिला महत्वाचा सल्ला - ऋषभ पंत

आयपीएल 2022 मध्ये ऋषभ पंतची कामगिरी चांगली राहिली नाही. त्यामुळे आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ( Former fast bowler Shoaib Akhtar ) दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला ( Captain Rishabh Pant ) त्याच्या खराब कामगिरीनंतर एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

Rishabh Pant
Rishabh Pant
author img

By

Published : May 9, 2022, 4:14 PM IST

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 55 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 91 धावांनी पराभव केला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals ) संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण दिल्ली कॅपिटल्स संघाचा यंदाच्या हंगामातील हा सर्वात मोठा पराभव होता. आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ( Former fast bowler Shoaib Akhtar ) दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला ( Captain Rishabh Pant ) त्याच्या खराब कामगिरीनंतर एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

आयपीएल 2022 मध्ये ऋषभ पंतची कामगिरी चांगली राहिली नाही. त्याला 10 सामन्यांत 31.22 च्या सरासरीने केवळ 281 धावा करता आल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट निश्चितपणे 150 पेक्षा जास्त आहे पण त्याला या स्पर्धेत आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याची सर्वोच्च धावसंख्या 44 आहे. पंतला त्याच्या फिटनेसवर काम करण्यासोबतच मानसिक पैलूवरही काम करावे लागेल, असे शोएब अख्तरने म्हटले आहे.

ऋषभ पंतला त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करावे लागेल - शोएब अख्तर

स्पोर्ट्सकीडावरील संभाषणादरम्यान शोएब अख्तरने ऋषभ पंतच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "ऋषभ पंतला त्याच्या फिटनेसवर काम करण्याची गरज आहे. याशिवाय त्याला प्रचंड उत्कटता दाखवावी लागते आणि आपले लक्ष कायम राखावे लागते. असे अनेक सामने खेळले गेले आहेत आणि त्यामुळे क्रिकेटची कारकीर्द खूपच लहान झाली आहे."

शोएब अख्तर पुढे म्हणाला, "7-8 किंवा 10 वर्षे ही कमाल क्रिकेट कारकीर्द आहे. 2013 च्या आसपास विराट कोहली खूप उंच शिखरावर होता हे आम्ही पाहिले पण आता तो धावा करण्यासाठी कसा झगडतोय ते बघा. ऋषभ पंत एक जबरदस्त प्रतिभा आहे. त्याला भरपूर संधी आहेत. मी त्यांना चुकवू नका असा सल्ला देतो."

ऋषभ पंतबद्दल बोलायचे झाले तर तो एक जबरदस्त फलंदाज आहे. तो त्याच्या जलद खेळीसाठी ओळखला जातो. मात्र, आयपीएलच्या यंदाच्या मोसमात त्याच्या बॅटमधून मोठ्या खेळीची प्रतीक्षा आहे. कोणत्याही सामन्यात त्याला स्वबळावर संघाला विजय मिळवून देता आलेला नाही. त्याने अद्याप चांगली खेळी केलेली नाही.

हेह वाचा - IPL 2022 Updates :...म्हणून दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात रविंद्र जडेजाला वगळले, धोनीने केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.