ETV Bharat / sports

IPL 2022 Final : फायनल सामन्यात राजस्थान रॉयल्सची 'या' टॉप-5 खेळाडूंवर आहे भिस्त - ipl news

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मध्ये राजस्थानचा संघ 14 वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचला आहे, याआधी 2008 साली या संघाने विजेतेपद पटकावले होते. त्याचबरोबर गुजरातचा संघ प्रथमच आयपीएल खेळत आहे. यावेळी हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसनने आपल्या नेतृत्वाने सर्वांना प्रभावित केले आहे.

RR
RR
author img

By

Published : May 29, 2022, 6:12 PM IST

अहमदाबाद: आयपीएल 2022 चा अंतिम सामना ( IPL 2022 Final ) आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( RR vs GT ) यांच्यात होणार आहे. 14 वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचलेल्या राजस्थान संघाकडून मोठ्या आशा आहेत. यापूर्वी 2008 साली संघाने विजेतेपद पटकावले होते. या सामन्याला आयपीएल 2022 समारोप सोहळ्यांनंतर सुरुवात होणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाची प्रमुख पाच खेळाडूंवर ( RR highest expectations from five players ) असणार आहे. चला तर जाणून घेऊन कोण आहेत ते पाच खेळाडू...

गुजरात टायटन्सचा संघ प्रथमच आयपीएल खेळत आहे आणि लीग सामन्यात शानदार खेळ दाखवत पहिल्या स्थानावर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. राजस्थानला अंतिम फेरीत नेण्यात जोस बटलरचे मोठे योगदान आहे. आम्ही तुम्हाला राजस्थानच्या बटलर बरोबरच अशा खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आतापर्यंत बॅट आणि बॉलने जबरदस्त खेळ दाखवला आहे.

विस्फोटक फलंदाज जोस बटलर -

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने ( Opener Jose Butler ) या मोसमात जबरदस्त फॉर्मध्ये दिसून आला आहे. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याने शानदार खेळ दाखवला आणि राजस्थान संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. या मोसमात आतापर्यंत त्याने चार शतके झळकावली आहेत. आता अंतिम सामन्यात त्याच्याकडून अजून एका मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. बटलरने 16 सामन्यात 58.85 च्या सरासरीने 824 धावा केल्या आहेत. अंतिम सामन्यात जोस बटलरच्या बॅटने धावा केल्या तर राजस्थानसाठी खुप महत्वाचे ठरणार आहे.

फिरकीपट्टू युझवेंद्र चहल -

राजस्थान रॉयल्सचा हा खेळाडू त्याच्या खेळामुळे तसेच त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. या मोसमात युझवेंद्र चहलच्या ( Spinner Yuzvendra Chahal ) नावावर सर्वाधिक विकेट्स असून तो पर्पल कॅपचा दावेदार आहे. या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 16 सामन्यांमध्ये त्याने 26 विकेट्स घेतल्या आहेत. आता अंतिम सामन्यात त्याच्याकडून देखील मोठ्या आशा आहेत.

फिरकीपट्टू रविचंद्रन आश्विन -

आर अश्विननेही ( Spinner Ravichandran Ashwin ) चहलला जोरदार साथ दिली. अश्विनने बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत कमाल केली आहे. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वाधिक प्रभावित केले. या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 16 सामन्यांमध्ये त्याने 185 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे.त्याचबरोबर गोलंदाजीचा विचार केला तर त्याच्या नावावर 12 विकेट्स आहेत.

कर्णधार संजू सॅमसन -

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन ( Captain Sanju Samson ) ही संघाची सर्वात मोठी ताकद आहे. अनेक सामन्यांमध्ये त्याने दमदार खेळ दाखवत संघाला दमदार सुरुवात करून दिली आहे. त्याचबरोबर, त्याच्या कूल-स्टाईल नेतृत्वाचेही खूप कौतुक झाले आहे. अंतिम सामन्यात सॅमसनला जबरदस्त खेळ दाखवावा लागणार आहे.

वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट -

राजस्थान संघाच्या वेगवान गोलंदाजीची कमान ट्रेंट बोल्टच्या ( Fast bowler Trent Bolt ) खांद्यावर असेल. सुरुवातीच्या षटकांमध्ये विरोधी संघाला धक्के देण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. ट्रेंट बोल्टला प्रसिद्ध कृष्णाचीही साथ मिळेल. गोलंदाजीच्या आक्रमणाची जबाबदारी त्याच्यावर असणार आहे. त्यामळे राजस्थान रॉयल्स संघाला त्याच्याकडून खुप अपेक्षा असतील.

हेही वाचा - Ipl 2022 Final : आयपीएल फायनलमध्ये राशीद खानविरुद्ध बटलरला काळजी घ्यावी लागेल माजी क्रिकेटपटूचे वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.