पुणे: पुणे : मंगळवारी (26 एप्रिल) आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 39 वा सामना पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. या दोन संघातील हा सामना यंदाच्या हंगामातील दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीने आरआरला पराभूत केले होते. या परभवाचा बदला घेण्यासाठी संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान सज्ज असणार आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आतापर्यंत राजस्थान रॉयल्स संघाने ( Rajasthan Royals Team ) सात सामने खेळले आहेत, त्यापैकी पाच सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे संघाचे दहा गुण असून हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने( Royal Challengers Bangalore Team ) आठ सामने खेळले असून पाच विजय आणि तीन पराभव नोंदवले आहेत. त्यामुळे या संघाच्या खात्यात दहा गुण आहेत. म्हणून हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. राजस्थानने आपल्या मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे, तर बंगळुरु संघाने मागील सामन्यात हैदराबाद संघाकडून परभव स्वीकारला आहे.
-
We’re back in Pune for #RCBvRR Vol. 2 🔥👀
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
📰 Your pre-match read 👇
">We’re back in Pune for #RCBvRR Vol. 2 🔥👀
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 26, 2022
📰 Your pre-match read 👇We’re back in Pune for #RCBvRR Vol. 2 🔥👀
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 26, 2022
📰 Your pre-match read 👇
राजस्थान रॉयल्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, या संघातील खेळाडूंनी दोन्ही विभागात शानदार प्रदर्शन केले आहे. जोस बटलरची ( Jose Butler ) बॅट सध्या आग ओकत आहे. त्याने आतापर्यंत पंधराव्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या तीन शतकांता समावेश आहे. त्याचबरोबर युझवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal ) फिरकीसमोर विरोधी संघातील फलंदाज हतबल दिसत आहेत. मात्र आरसीबी संघाचे चित्र वेगळे आहे, कारण फाफ डु प्लेसिस आणि दिनेश कार्तिक वगळता कोणी सातत्याने धावा करत नाही. गोलंदाजीमध्ये देखील हर्षल पटेल शिवाय कोणाला छाप पाडता आलेली नाही.
-
We’re back in Pune for our second game at the MCA Stadium and it’s going to be one exciting clash! ⚔️
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Are you ready for Game Day, 12th Man Army? 🥳#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RCBvRR pic.twitter.com/LysBI0lmNm
">We’re back in Pune for our second game at the MCA Stadium and it’s going to be one exciting clash! ⚔️
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 26, 2022
Are you ready for Game Day, 12th Man Army? 🥳#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RCBvRR pic.twitter.com/LysBI0lmNmWe’re back in Pune for our second game at the MCA Stadium and it’s going to be one exciting clash! ⚔️
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 26, 2022
Are you ready for Game Day, 12th Man Army? 🥳#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RCBvRR pic.twitter.com/LysBI0lmNm
आरसीबी विरुद्ध आरआर यांच्यातील हेड टू हेड - राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात 26 सामने खेळले गेले आहेत. त्यामधील आरसीबीने 13 सामने जिंकले आहेत. तसेच राजस्थानने 10 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. तर एक सामना रद्द झाला. या मोसमातील पहिल्याच सामन्यात आरसीबीने बाजी मारली होती. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रदरफोर्ड, जॅफेन बेंगलोर, जे. सुयश प्रभुदेसाई, छमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार आणि सिद्धार्थ कौल.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, रियान पराग, शुभम गढवाल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, कुलदीप सेन, तेजस बरोका, अनुनय सिंग, केसी करिअप्पा, संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, रेसी व्हॅन डर ड्युसेन, नॅथन कुल्टर-नाईल, जिमी नेस मिशेल, करुण नायर, ओबेद मॅककॉय, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रशांत कृष्णा आणि युझवेंद्र चहल.
हेही वाचा - Ipl 2022 Point Table : प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई बाहेर पडल्यानंतर 'अशी' आहे गुणतालिका